गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते संपन्न
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने गावात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आबलोली येथील चंद्रकला पेट्रोल पंपा समोरील स्मशानभूमी ( वैकुंठ भूमी ) येथील जागेत कचरा विलगीकरण शेडचा भूमिपूजन सोहळा नुकताच गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे शुभ हस्ते करण्यात आला. Groundbreaking ceremony of waste segregation shed

यावेळी सरपंच सौ वैष्णवी नेटके यांचे हस्ते पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी यांनी कचरा विलगीकरण बाबत मौलिक मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले. Groundbreaking ceremony of waste segregation shed

यावेळी सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष आप्पा कदम, ग्रामपंचायत सदस्य सौ.रुपाली कदम, सौ. पायल गोणबारे, संजय कदम, महेंद्र कदम, दत्ताराम कदम, योगेश भोसले, सर्वेश साळवी, विद्याधर कदम, आशा सेविका सौ. विशाखा कदम, सौ. सानिध्या रेपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कचरा विलगीकरण शेडचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. Groundbreaking ceremony of waste segregation shed
