गुहागर, ता. 15 : गुहागर तालुका ओबीसी (OBC) संघर्ष समन्वय समितीची तालुका कार्यकारणी, जिल्हा परिषद गट उपसमित्या पदाधिकारी, सर्व सल्लागार यांची बैठक कुणबी नागरी पतसंस्था हॉल आबलोली येथे जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते, प्रांतिक सरचिटणीस कृष्णा वणे, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. कांगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीच्या प्रारंभी भारतरत्न, महामानव, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. Greetings to Dr. Babasaheb Ambedkar
यावेळी तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांनी सभेचे प्रास्ताविक केले व संघर्ष समन्वय समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत आपल्या वरिष्ठांकडे गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या काही अपेक्षा व्यक्त केल्या. त्याचबरोबर भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना, एनएमएमएस शिष्यवृत्ती याबाबत आणि जिल्हा परिषद शाळांतील जिर्ण जनरल रजिस्टर संगणकीकरण करण्याबाबत गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती दिली. आणी याविषयी जिल्हा स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी प्रमेय आर्यमाने, रविंद्र कुळे यानीही प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. Greetings to Dr. Babasaheb Ambedkar
निवडणुकांच्या दृष्टिकोनातुन महाराष्ट्र शासनाकडुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ओबीसींची घेण्यात येणारी माहिती याबद्दलच्या त्रुटी, कमी कालावधी याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी (OBC) संघर्ष समन्वय समिती यांच्या माध्यमातुन महाराष्ट्रात चालु असणारे काम, होत असलेली आंदोलने आणि भविष्यात आपले इच्छित साध्य करण्यासाठी करावी लागणारी आंदोलने याविषयी कृष्णा वणे यांनी मार्गदर्शन केले. Greetings to Dr. Babasaheb Ambedkar
सभेच्या अध्यक्षस्थानी असणारे ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे रत्नागीरी जिल्हाध्यक्ष श्री शरदचंद्र गीते यांनी ओबीसी (OBC) हा विषय फक्त तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर मर्यादित न ठेवता ओबीसी संघर्ष समन्वय समितीची शाखा गावागावात झाली पाहिजे आणि यातच आपल्या ओबीसींच्या पाल्यांचे उज्वल भविष्य आहे असे आवाहन उपस्थितांना केले. सभेच्या शेवटी तालुक्याचे सरचिटणीस श्री निलेश सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानुन सभेची सांगता केली. Greetings to Dr. Babasaheb Ambedkar
यावेळी गुहागर तालुका ओबीसी (OBC) संघर्ष समन्वय समिती अध्यक्ष पांडुरंग पाते, सरचिटणीस नीलेश सुर्वे, चिटणीस नरेश निमुणकर, सल्लागार रामचंद्र हुमणे गुरुजी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य प्रमेय आर्यमाने, गुढेकर गुरुजी, श्यामकांत खातु, दीपक पालशेतकर, विलास गुरव, प्रकाश कारेकर, सचिन म्हस्कर, अशोक घाणेकर, संतोष पावरी, धनंजय शिगवण, विजय मसुरकर, रविंद्र कुळे, पंचायत समिती माजी सभापती पुर्वी निमुणकर, सचिन बाईत, संतोष जैतापकर, पुजा कारेकर, वनिता डिंगणकर, आबलोली सरपंच श्रावणी पागडे, साक्षी रेपाळ, माजी पं.स. सदस्य रवींद्र आंबेकर दीपक पालशेतकर, शशिकांत पवार, पो.पा. महेश भाटकर आदीसह बहुसंख्य ओबीसी बंधु – भगीनी उपस्थीत होते. Greetings to Dr. Babasaheb Ambedkar