• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 April 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले

by Guhagar News
March 24, 2026
in Ratnagiri
136 2
0
Gram Panchayat Elections
268
SHARES
765
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 24 :  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महसूल विभागाने प्रभाग रचनेचा महत्त्वाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील शेकडो ग्रामपंचायतींच्या प्रारुप प्रभाग रचनेला अधिकृत मान्यता दिली असून, यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. Gram Panchayat Elections

निवडणुकीचे नियोजन आणि व्याप्ती ही प्रभाग रचना प्रामुख्याने जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींसाठी केली जात आहे. यामध्ये नवीन प्रभाग पाडणे, सदस्य संख्या निश्चित करणे आणि आरक्षणाचे प्रारूप ठरवणे या प्रक्रियेचा समावेश आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत की, ७ एप्रिल २०२६ पर्यंत या प्रभाग रचनेची ’नमुना ब’ अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात याव्यात. Gram Panchayat Elections

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची सविस्तर यादी:- मंडणगड तालुक्यामध्ये १५ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. दापोली तालुक्यातील सर्वाधिक ५८ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना होणार आहे. खेडमधील एकूण ८७ ग्रामपंचायतींची प्रक्रिया पार पडेल. चिपळूण येथील ८१ गावांचा समावेश आहे. गुहागर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना होणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेत समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना होईल. २३ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राजापूरमधील ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. Gram Panchayat Elections

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ७ एप्रिल रोजी जाहीर होणार्‍या प्रारूप प्रभाग रचनेवर आपल्या हरकती योग्य पुराव्यासह नोंदवाव्यात. त्यानंतर जिल्हाधिकारी या हरकतींवर सुनावणी घेऊन २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर करतील. Gram Panchayat Elections

Tags: Gram Panchayat ElectionsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.