गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांची प्रतिक्रिया
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाला गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव व त्यांचे सुपुत्र विक्रांतदादा जाधव यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली. Goodwill visit from MLA Bhaskarsheth Jadhav
यावेळी पत्रकारांशी बोलत होते. कागदावर नाही पण मनाने आम्ही एकत्र. मी धन्यवाद देतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इथले आमचे उपजिल्हाध्यक्ष विनोदजी जानवळकर यांना त्यांच्यासारखा तरुण असलेला विक्रांत जाधव तो जरी माझा मुलगा असला तरी सुद्धा मित्र म्हणून तो ज्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हाप्रमुख झाला. स्वभाविक आहे या सगळ्या तरुणांना आनंद झाला. आणि हा आनंद झाल्यानंतर त्यांनी अशी भावना व्यक्त केली की, आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे. त्यांनी मोठ्या मनानं सत्काराला या ठिकाणी बोलावलं पुढच्या कार्यक्रमाला जातोय आम्ही दोघे एकत्र आहोत म्हणून आम्ही येथे आलो. Goodwill visit from MLA Bhaskarsheth Jadhav
मी मनसेच्या कार्यालयामध्ये आलो अर्थात तुम्हाला असं वाटत असेल की, आता राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले म्हणून मी आलो तर तसे नाही यंदाच्या क्रिकेट सिजनला येथेच त्यांनी सालाबाद प्रमाणे स्पर्धा क्रिकेटच्या भरवल्या होत्या तेव्हा दोघे बंधू एकत्र आले नव्हते. तरी देखील आम्ही एकत्र आलो. आणि त्या वेळेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली होती. म्हणून मी त्यांना म्हटलं होतं लवकरच माझ्या डोक्यावर तुमचे छत्र राहील आणि त्याची प्रचिती आज आली. Goodwill visit from MLA Bhaskarsheth Jadhav

गुहागर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का? हे तिचे संकेत आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना आमदार भास्करशेठ जाधव म्हणाले की, याचा आणि युतीचा काहीच संबंध नाही परंतु आता सगळ्याच ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रित राहावं असं एकंदरीत महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची भावना आहे आणि नेत्यांची देखील ती भावना आहे म्हणून अधिकृतपणे जरी त्या संदर्भात कुठलाही निर्णय किंवा घोषणा झाली नसली तरी त्यातून तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे दिसली असेल की, कागदावर नसेल पण मनातून आम्ही सगळे एक झालोय त्याचे हे चित्र.. Goodwill visit from MLA Bhaskarsheth Jadhav
मनसेची छत्री तुमच्या डोक्यावर कायम राहणार का? या प्रश्नाला उत्तर देताना आमदार भास्करशेठ जाधव पुढे म्हणाले की, तो गमतीचा एक भाग होता. योगायोग जुळून आला. असे काय योगायोग जुळून येत असतात. त्यामुळे भविष्यामध्ये एकत्र राहण्याचा योग कायम राहावा एवढीच प्रार्थना.. असे मिश्किल पणे उत्तर आमदार भास्करशेठ जाधव यांनी दिले. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, राहूल जाधव यांचेसह महाराष्ट्र सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. Goodwill visit from MLA Bhaskarsheth Jadhav
