• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळुणात सोनाराला अटक

by Guhagar News
November 24, 2023
in Ratnagiri
220 3
0
Goldsmith arrested in Chiplun
433
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

८० हजाराचा अपहार

रत्नागिरी, ता. 24 : लग्नात पत्नीला बनवलेले सोन्याचे मंगळसूत्र काही दिवसाने काळे पडले. ते पुन्हा बनवून देण्यासाठी सोनाराला परत दिले असून ते परत न दिल्याने ८० हजाराचा अपाहार केल्याचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी चिपळूण येथील सोनाराला बुधवार दि. २२ रोजी सकाळी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. Goldsmith arrested in Chiplun

खेड, सोनगाव येथील सचिन नारायण खेराडे यांनी फिर्याद दिल्यानुसार त्यांनी आपल्या विवाहप्रसंगी आरोपी राजबिहारी निताई मन्ना, सध्या रा: पटेल प्लाझा, भेंडी नाका, चिपळूण, मूळ पश्‍चिम बंगाल) या सुवर्णकाराकडून ८० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र नवीन बनवून घेतले. लग्नानंतर हे मंगळसूत्र हळूहळू काळे पडू लागल्याचे पत्नीने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पुन्हा नवीन मंगळसूत्र बनविण्यासाठी आरोपी राजबिहारी याला देण्यात आले. परंतु त्याने ते अद्याप बनवून न दिल्याने ५ ऑगस्ट रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Goldsmith arrested in Chiplun

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राजबिहारीला बुधवारी अटक केली व न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे अधिक तपास करीत आहेत. Goldsmith arrested in Chiplun

Tags: Goldsmith arrested in ChiplunGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share173SendTweet108
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.