गुहागर पर्यटनाला नवी दिशा मिळण्याचे शुभ संकेत
लेखक – सत्यवान घाडे
गुहागर न्यूज : राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रायोगिक तत्त्वाच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठीचे समुद्रकिनाऱ्यांमध्ये गुहागरचा सहभाग हे पर्यटनाला नवी दिशा, गती मिळण्याचे शुभ संकेत आहे. सुरू झालेले हे पर्यटन आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याकरता गुहागरच्या पर्यटन वाढीची सुवर्णसंधी चालून आले आहे. Golden opportunity for Blue Flag Guhagar
गुहागर तालुक्याचे ठिकाण असलेले शहराला सहा किलोमीटरचा विस्तीर्ण स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे त्याचबरोबर शहराबरोबर तालुक्यातही अनेक पुरातन मंदिर आहेत यामुळे गुहागरचे पर्यटन आज बऱ्यापैकी गती घेत असल्याचे दिसून येत आहे अशा या पर्यटनाला नवी दिशा नवी गती देण्याची सुवर्णसंधी ब्ल्यू फ्लॅग च्या माध्यमातून चालून आली आहे. निसर्ग संवर्धना बरोबर आर्थिक स्त्रोत उंचावण्याचा यातून आशेचा किरण उदयास येत आहे. आज गुहागर हे ठिकाण किती जणांना माहीत आहे याची कल्पना सध्या पर्यटकांना सेवा देणारे गुहागरवासीयांनाच समजून चुकले आहे. यामुळे पुढील काही वर्षात जर या पर्यटनामध्ये कोणताही विकास झाला नाही तर मात्र गुहागरचे पर्यटन खुंटलेल्या अवस्थेत राहू शकते. यामुळे या मानांकनासाठी शहरवासीयांनी एकत्रित येऊन याला सहकार्य करणे गरजेचे आहे. Golden opportunity for Blue Flag Guhagar

एरॉन बंद पडल्यानंतरचा काळ आठवा
1989 – 90 यादरम्याने ग्रामीण भाग असलेल्या या गुहागर शहरांमध्ये एरॉन चा दाभोळ वीज प्रकल्प दाखल झाला या प्रकल्पाचे काम सुरू होताना शहरवासी यांना अनेक गोष्टींच्या आकलन झाले. मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली रोजगाराची संधी, आलेल्या बाहेरील कामगार वर्ग व अधिकारी यांना भाडेपट्ट्यावर ठेवून होणारे अर्थाजन, अनेकांनी वाहने कंपनीमध्ये लावून आपला आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. मात्र सन 2000 मध्ये हा प्रकल्प बंद पडताच गुहागर शहराबरोबर तालुक्याची ही दयनीय अवस्था झालेली सर्वांनीच पाहिली. अनेकांची कर्जावर घेतलेली वाहने बँकांनी ओढून नेली. अचानक रोजगार थांबल्याने पुढे काय करावे याबाबतचेही कोणतेही निर्णय त्यानंतरच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये होत नव्हते अनेकांनी मुंबई ही गाठली अशा मधूनच श्रीदेव व्याडेश्वर व श्री दशभुज लक्ष्मी गणेश दर्शना करिता येणारा भाविक हळूहळू गुहागर समुद्राकडे वळला त्याच वेळेला गुहागर समुद्रकिनाऱ्यावर केवळ एकच भेळ पुरी सेंटरची गाडी होती आणि त्याचे हळहळू मोठे स्वरूप होऊन गुहागरचा सहा किलोमीटरचा हा विस्तीर्ण समुद्रकिनारा पुणा मुंबई नाशिक नागपूर कोल्हापूर या भागामध्ये पोहोचला. आलेल्या पर्यटकांची राहण्याची व्यवस्था ही शहरांमध्ये नव्हती यामध्येच घरगुती राहण्याची व्यवस्था ही सुरू झाली यामुळे आज या पर्यटनाला हळूहळू गती निर्माण झाली आहे मात्र येत्या काही वर्षात पर्यटन वाढीसाठी ठोस पावले उचलली नाही तर मात्र हे पर्यटन ठराविक मर्यादेपर्यंतच राहू शकतात. आज 80 दिवस ते 125 दिवस असा पर्यटन हंगामाचा व्यवसाय होत आहे. दीपावली वर्ष अखेर शिमगोत्सव आंब्याचा सिझन असे विविध विषय घेऊन पर्यटक गुहागर मध्ये पर्यटनासाठी दाखल होत आहेत. गेली 25 वर्ष पर्यटन वाढीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत यामुळे आजही एरॉन बंद पडल्यानंतर चे दिवस आठवा असे म्हणावे लागेल. Golden opportunity for Blue Flag Guhagar

समुद्रावर उभारलेले उपक्रम टिकणे गरजेचे होते
अतिशय कमी प्रमाणामध्ये सुरू असलेल्या या पर्यटनाला फुंकर घालण्याचे काम 2009 नंतर गुहागरचे तात्कालीन नगर विकास मंत्री विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केले. पर्यटन वाढीसाठी समुद्रकिनाऱ्यावर नक्षत्र वन, फ्लोटिंग जेटी, नाना नानी पार्क, सी व्ही यु गॅलरी यासारख्या उपक्रमामुळे गुहागरच्या पर्यटनामध्ये अधिक वाढ सुरू झाली मात्र यामध्येही राजकीय वास आल्याने आज हे सर्व उपक्रम काढून टाकण्यात आले आहेत. हे उपक्रम टिकवण्यासाठी शहरवासी यांनी सहभाग न घेतल्याने पर्यटन खुंटल्यासारखे झाले आहे. Golden opportunity for Blue Flag Guhagar
सर्वांनी एकत्र येणे गरजेचे
एरॉन प्रकल्प उभारताना गुहागर शहरातून कंपनी पर्यंत जाणारा रस्ता मोठा न झाल्याने पर्यायी आज शृंगारतही बाजारपेठेने आर्थिक राजधानी म्हणून नाव कमावले आहे. यामुळे गुहागर शहराबरोबर तालुक्यालाही पर्यटनाची नवी दिशा देणारा हा ब्ल्यू फ्लॅग मानांकन चालून आलेली संधीच म्हणावे लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. राजकारणा मधून काय होते हे गेली वर्षभर गुहागर शहरवासीय अनुभव घेत आहेत आज गुहागर तालुक्याच्या पर्यटनासाठी कोणीही पुढे येत नाही बेरजेची गणित जुळत नाहीत म्हणून होत असलेले दुर्लक्ष शहरवासीयांनी लक्षात घेतले पाहिजेत. गेली दहा वर्ष नगरपंचायतीच्या माध्यमातून कोणता शाश्वत विकास झाला यावरही प्रकाश टाकणे गरजेचे आहे. केवळ एकाने काढलेल्या मुद्द्यावरून आपले अज्ञान दाखवत चुकीचे विचार मांडणे हे गुहागर शहराबरोबर तालुक्याच्या विकासासाठी मारक ठरणारे आहे. यामुळे ब्ल्यू फ्लॅग मानांकना ची चालून आलेली ही सुवर्णसंधी असून सर्वांनी सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन आपले नैसर्गिक सौंदर्य टिकवून या उपक्रमाला सहकार्य करणे गरजेचे आहे अन्यथा यासारखे कोणतीही दुर्भाग्य नाही असे म्हणावे लागेल. Golden opportunity for Blue Flag Guhagar

विरोधकांचे डावपेच ओळखा
गेली दोन वर्ष शहराच्या विकासासाठी नगरपंचायतीकडे किती निधी आला याची माहिती घेतल्यास शहराच्या पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी राज्य सरकारचा हा उपक्रम किती महत्त्वाचा आहे याची ओळख करून घेणे शहरवासीयांनी गरजेचे आहे. ब्ल्यू फ्लॅग मानांकनाबाबत गुहागर नगरपंचायत तक्रार निवारण आणि आपले गुहागर या दोन व्हाट्सअप ग्रुप वरून अनेक जण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींनी तर आपल्या अज्ञानाचेही प्रदर्शन केलेले पहावयास मिळते. यातील गुहागर पोलीस परेड मैदानावरील क्रीडांगण वाचवा हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. यातूनच हा मानांकनाचा विषय आणला कोणी असेही बोलून एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे अशा विषयातून विरोधाची धार करण्यापेक्षा या उपक्रमाची प्रत्यक्ष माहिती घेणे गरजेचे आहे. शहरातले खेळाचे मोठे ग्राउंड म्हणून पोलीस परेड ग्राउंड याकडे पाहिले जाते. सदर जागा ही शासनाची असून त्यावर अनेक चर्चा सध्या रंगत आहेत. मात्र हे क्रीडांगणही राहिले पाहिजे आणि पर्यटनाच्या विकासासाठी ब्ल्यू फ्लॅग मानांकनाचे 33 अटींची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा आपणच आपल्या पायावर….. मारून घेतल्यासारखेच होईल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. Golden opportunity for Blue Flag Guhagar
डीपी मध्ये क्रीडांगण आरक्षणासाठी आवाज का उठला नाही
गुहागर पोलीस परेड मैदान हे क्रीडांगण या नावाने जरी नोंद असली तरी ते केव्हाही प्रशासन आपल्या इतर उपक्रमासाठी वापरू शकते. यामुळे जर क्रीडांगण वाचवायचे होते तर गुहागर नगरपंचायतीने बनवलेल्या डीपी मध्ये या शासकीय जागेवर क्रीडांगण म्हणून आरक्षण पडावे असे शहरातील एकानेही आवाज उठवलेला नाही. वाढलेले रस्ते कमी करणे काही जागांवर आरक्षण उठवणे आधी विषयांवर मोर्चा काढला मात्र आज महत्त्वाचे मानले जाणाऱ्या या क्रीडांगण विषयासाठी त्यावेळी अनास्था का असाही सवाल उठत आहे. मात्र असे असले तरी आजही हे क्रीडांगणच राहावे असे सर्वांचेच मत राहील. परंतु ब्ल्यू फ्लॅग आम्हाला नको असे म्हणणे म्हणजे गुहागरच्या विकासासाठी धोक्याची घंटा असल्याचे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. Golden opportunity for Blue Flag Guhagar

नगरपंचायतीमधून गेल्या दोन वर्षात किती विकास निधी आला
गुहागर नगरपंचायत गेली दोन वर्ष स्वच्छता आणि शहराचे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यामध्येच गुंतली आहे गेल्या वर्षभरात जी कामे करण्यात आली ती कामे सन 2022 – 23 मधील असून 2023-24 आणि 2024 – 25 या वर्षांमध्ये गुहागर नगरपंचायतीला विकासासाठी निधीच आलेला नाही. रस्ते अनुदान जिल्हा नियोजन व आधी विभागातून निधी न आल्याने गेल्या दोन वर्षात विकास दाखवा असे म्हणावे लागेल. चार वर्षांपूर्वी उभारणी सुरू असलेली पथदीप अद्याप सुरू झालेले नाही. पथदीप उभारताना वीज पुरवठा बाबतचे कोणतेच नियोजन नसल्याने आज हे पथदिप सुरू होऊ शकत नाही. सुरू असलेले पथदीप सुरळीत ठेवण्याकरता नगरपंचायतीची जुळवा जुळव आजही सुरू आहे. जी छोट्या रकमेची कामे झाली ती 15 वा वित्त आयोग मधून झाली असल्याची माहिती नगरपंचायतीकडून प्राप्त झाली आहे. यामुळे जर विकास साधावयाचा आहे तर राज्य सरकारने देऊ केलेला हा नवीन उपक्रम पुढे येणे गरजेचे आहे. Golden opportunity for Blue Flag Guhagar
ब्ल्यू फ्लॅग सारखा उपक्रम शासनासमोर ठेवत नाही तोपर्यंत गुहागरच्या विकासासाठी निधी येणार नाही अशी माहिती नगरपंचायतीकडून प्राप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे हे मानांकन प्राप्त करण्यासाठी पर्यटकांना सोयीसुविधा उभारण्यासाठी राज्य सरकार व संपूर्ण प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहे यातूनच आपल्या समुद्रकिनाऱ्याचा विकास होऊ शकतो त्याचबरोबर या समुद्रकिनाऱ्याला कनेक्टिव्हिटी असलेले रस्तेही चांगल्या पद्धतीचे होऊ शकतात. आजही पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवणारे छोटे उद्योग अनधिकृत असून त्यावर कारवाईची टांगती तलवार आहे अशा स्थानिक व्यावसायिकांना स्थिरस्थावर करता येईल. रोजगाराच्या संधीही स्थानिकांसाठीच मिळाव्यात. यासाठीचा जोर शहरवासीयांनी धरणे गरजेचे आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत ब्ल्यू फ्लॅग मानांकनाचा हा उपक्रम शहराच्या विकासाचा स्त्रोत बनू शकतो.

छोट्या उद्योगातून शहरवासीयांनी साधावी आर्थिक उन्नती
वर्षभरात ऐंशी ते सव्वाशे दिवस चालणारा हा पर्यटन व्यवसाय आणखी 50 दिवसांनी जरी वाढला तरी अनेकांच्या हाताला काम मिळू शकते. आज गुहागर शहराबरोबर तालुक्यात कोणतीही मोठी कारखानदारी नाही. शेती करावयाची म्हटल्यास वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे याचे प्रमाणही कमी होत आले आहे. ब्ल्यू फ्लॅग मानांकन हे धन दांड्या जमीनदारासाठी का असा सूरही काही जणांनी लगावला होता मात्र जमीन विकणारे ही आपण तर जमीन घेणाऱ्याचा दोष काय, यातून दुसऱ्याला दोष देणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरू शकते. यामुळे आपणच आपल्या जमिनीवर पर्यटनाचा व्यवसाय सुरू केला तर आज शहराची आर्थिक उन्नती साधता येईल. या उपक्रमातून नैसर्गिक साधनसंपत्तीची जपणूक करत आर्थिक उन्नती नक्कीच साधता येईल. यामुळे सर्वांनी संघटित होऊन या आलेल्या सुवर्णसंधीचा लाभ उठवणे सर्वांच्याच फायद्याचे ठरणारे आहे. Golden opportunity for Blue Flag Guhagar
