• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला सलग दुसरे रौप्यपदक

by Mayuresh Patnakar
September 4, 2026
in Ratnagiri
71 1
1
Gogate-Joglekar College wins silver medal
140
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 04 : मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी रौप्यपदक पटकावले असून सांघिक उपविजेतेपद मिळवले आहे. महाविद्यालयाच्या तसेच कोंकण विभागाच्या महिला बॅडमिंटन संघासाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. Gogate-Joglekar College wins silver medal

मुंबई विद्यापीठ मुंबई आणि एस. एम. शेट्टी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय (स्वायत्त), पवई यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुलुंड येथील कालिदास क्रीडा संकुलात मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला बॅडमिंटन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Gogate-Joglekar College wins silver medal

या स्पर्धेसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. श्रुती फणसे (एम.ए. भाग-१) आणि कु. चार्वी कापडी (एस.वाय.बी.कॉम.), बॅ. बी. के. वेंगुर्ले महाविद्यालयाच्या कु. सबा शेख, तसेच एस. आर. एम. कुडाळ महाविद्यालयाच्या कु. श्रेया सामंत व कु. मैथिली ठाकूर यांची कोंकण विभाग क्रमांक ४ महिला बॅडमिंटन संघात निवड झाली होती. कोंकण विभागाचे प्रतिनिधित्व करताना कु. श्रुती फणसे हिने कर्णधारपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. तिच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर संघाने स्पर्धेत दमदार कामगिरी करत सांघिक उपविजेतेपद पटकावले. त्यामुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि कोंकण विभागाला मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी रौप्यपदक मिळाले आहे. महाविद्यालयाच्या तसेच कोंकण विभाग महिला बॅडमिंटन संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व श्री. अब्दुलसमद शेख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री. माधव फणसे व क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांचे सहकार्य मिळाले. Gogate-Joglekar College wins silver medal

या यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, प्राध्यापक व कर्मचारी यांनी महिला बॅडमिंटन संघाचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Gogate-Joglekar College wins silver medal

Tags: Gogate-Joglekar College wins silver medalGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.