गुहागर, ता. 16 : येथील गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर या विद्यालयाच्या २००३ सालच्या एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला १६ सीलिंग फॅनची सस्नेह भेट देत शाळेप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली. Gift of fans to Guhagar School

विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्ये अधिक चांगल्या व प्रसन्न वातावरणात शिक्षण घेता यावे, या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांनी ही उपयुक्त भेट दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विद्यालयाच्या वतीने २००३ एस.एस.सी. बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शाळेने दिलेल्या संस्कारांची जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांनी केलेले हे योगदान कौतुकास्पद असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. Gift of fans to Guhagar School

यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे, उपमुख्याध्यापिका श्रीम. मनिषा सावंत, पर्यवेक्षिका सौ. गायत्री कनगुटकर, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने २००३ एस.एस.सी. बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे मॅडम यांनी मनःपूर्वक आभार मानण्यात आले. Gift of fans to Guhagar School
