गुहागर, ता. 12 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11: 00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा आबलोली येथील प्रधान कार्यालयातील सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र रत्नू हुमणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. General Meeting of Kunbi Credit Union
तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, जेष्ठ संचालक पांडुरंग पाते, संचालक प्रदीप बेंडल,महादेव वणे, संदेश कदम, वैभव आदवडे, उदय गोरीवले, अमोल वाघे, संचालिका श्रीम. वनिता डिंगणकर, सौ. श्रावणी पागडे, तज्ञ संचालक अनंत पागडे, संदीप पास्टे, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर यांनी केले आहे. General Meeting of Kunbi Credit Union
