गुहागरच्या आमसभेत पाणीपुरवठा, महावितरणविरोधात सर्वाधिक तक्रारी
गुहागर, ता. 09 : तालुक्याची आमसभा आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पाटपन्हाळे येथील श्री पूजा मंगल कार्यालय येथे पार पडली. या सभेत पाणीपुरवठा व महावितरणविरोधात आलेल्या तक्रारीबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. यावेळी गुहागर न्यायालयाच्या जवळ मोठा अश्वरुढ शिवाजी राजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती आ. भास्कर जाधव यांनी दिली. General Assembly of Guhagar Taluka
सभेच्या सुरुवातीला वर्षभरात झालेल्या दुर्घटनांमधील मृत व्यक्ती, दिवगंत नेतमंडळी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी तालुक्यातील शाळांमधील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थी, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक, एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकीलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गुहागरचे तहसिलदार परिक्षीत पाटील यांना उत्कृष्ट तहसिलदार म्हणून जिल्हास्तरावरुन निवड झाल्याबद्दल, स्वच्छता अभियानात खामशेत ग्रा.पं. कोकणात प्रथम आल्याबद्ल सरपंच मंगेश सोलकर आदींना गौरविण्यात आले. General Assembly of Guhagar Taluka
पाणीपुरवठा तक्रारींमध्ये काताळे येथील ग्रा.पं. सदस्य मधुकर असगोलकर यांनी गावातील काही नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे असल्याची खंत व्यक्त करुन अपूर्ण पाणी योजनेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी, ठेकेदार यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. तालुक्यातील सर्वच भागाला पाणीपुरवठा होत असताना कोणतीही टंचाई नसताना येथील योजना का रखडली असा सवाल आ. जाधव यांनी उपस्थित करुन ही योजना तात्काळ मार्गी लागावी, असे संबंधितांना सूचित केले. General Assembly of Guhagar Taluka

तसेच नागरिकांनी महावितरणविरोधात आपला संताप व्यक्त केला. सडे जांभारी येथील वीजवाहिनी व शृंगारी मोहल्ला येथील धोकादायक वीजवाहिनी बदलण्याबाबत व तालुक्यातील जुने वीज खांब बदलण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या असे अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. महावितरणविरोधात सर्वाधिक तक्रारी असल्याने यासंदर्भात तालुक्यातल सर्व सरपंच, उपसरपंच यांची एक अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावावी, अशी आ. भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. General Assembly of Guhagar Taluka
गुहागर तालुक्यात असंघटीत कामगारांच्या राबविण्यात आलेल्या योजनेवर पालशेत विभागातील काही कामगारांकडून पैसे घेऊन त्यांना फसविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला. मागील आमसभेतही हा विषय पुढे येऊन त्याची चौकशी करुन कारवाई करावी असा ठराव करण्यात आला होता मात्र, याचे पुढे काय झाले व या आमसभेत हा पटलावर विषय का आला नाही, असा सवाल आ. जाधव यांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांना केला. पुन्हा या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश त्यांनी दिले. General Assembly of Guhagar Taluka

यावेळी कारुळ फाटा ते पांगारी रस्ता दुरुस्तीबाबत अद्यापही बांधकाम विभागाकडून अनास्था दाखविली जात असल्याचा मुद्दा विनायक मुळे यांनी उपस्थित केला. रस्त्यालगतची झाडी तोडही झालेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला नोटीस द्यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली. तालुक्यात स्मार्ट मीटर बळजबरीने बसविले जात आहेत, असा मुद्दा अजित बेलवलकर यांनी उपस्थित केला. यावर आ. जाधव यांनी चिपळूण तालुक्यात विरोध होत असताना गुहागर तालुक्यातील लोक हे मीटर बसविण्याला विरोध का करीत नाहीत. असा सवाल उपस्थित नागरिकांना करुन याप्रश्नी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. General Assembly of Guhagar Taluka
गुहागर शहरातील पथदीप बसविण्याचा विषय समोर आला. याचे खांब उभे असून अद्यापही दिवे लागलेले नसून नगरपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. समुद्रकिनारचे बांधलेले बंधारे हे निकृष्ट असून यांच्यावर कोणतीही कारवाई झालेला नाही मात्र, समुद्रकिनारचे सी व्ह्यू गँलरी, जेटी यांच्यासारखी पर्यटनाला चालना देणारी बांधकामे विनाकारण जमीनदोस्त करण्यात आल्याचे आ. जाधव यांनी बोलून दाखविले. अशा प्रकारांमुळे गुहागर शहराच्या बाबतीत न बोललेलेच बरे असेही त्यांनी स्पष्ट केले. General Assembly of Guhagar Taluka
असगोली ग्रा.पं.चे ग्रामसेवक क्षिरसागर यांच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर बोलताना आ. जाधव यांनी अशा ग्रामसेवकाची येथून बदली न करता त्यांच्यावर एकापेक्षा अधिक ग्रा.पं.चा कारभार सोपवावा, असे आ. जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचित केले. या आमसभेत विधानसभा निवडणूक दरम्यान, घडलेल्या अण्णा जाधव हल्लाप्रकरणी, सापडलेले आरोपींविषयीची गुहागरच्या पोलिसांनी मीडियासमोर माहिती दिली पाहिजे होती, असा प्रश्न राज विखारे यांनी उपस्थित केला. यावर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी अजून एका आरोपीचा शोध सुरु असल्याचे सांगून गोपनियतेचा मुद्दा पुढे केला. यावर आ. जाधव यांनी मटका, दारुच्या अड्यांवर होणाऱ्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन उपस्थित पोलिसांचा समाचार घेतला. General Assembly of Guhagar Taluka
यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसिलदार परिक्षीत पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, आजी-माजी सरपंच, माजी सभापती, सदस्य, व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. General Assembly of Guhagar Taluka