मुंबई, ता. 25 : देशातील विविध राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड तापमान वाढ दिसून आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात थोडी घट झाली असून काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातही काही भागात थंडी जाणवू लागली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे सांगितले आहे. From November, the intensity of cold will increase


अरबी समुद्रात तेज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात हमून चक्रीवादळ तयार झाले आहे. २०१८ नंतर प्रथमच एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. हवामान खाते यावर लक्ष ठेवून आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर आणि गुजरातवर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. गुजरातमध्ये आगामी पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे तर महाराष्ट्रात देखील या चक्रीवादळाचा कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. From November, the intensity of cold will increase
हिमालयाच्या कुशीत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातदेखील उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात यंदा थंडीला सुरुवात झाल्याचे चित्र असून सोमवारी शहरातील किमान तापमान राज्यात सर्वांत कमी १५ अंशांपर्यंत खाली आले होते. यंदा पावसाच्या त-हेमुळे राज्यात थंडीचे चित्र कसे असणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना थंडी पडणार का? तापमानात काय बदल होतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणा-या महाबळेश्वरचे रात्रीचे तापमान १७ अंशावर होते. त्यापेक्षा २ अंशांनी जळगावचे तापमान कमी म्हणजेच १५ अंशावर होते. दुसरीकडे दिवसाचे तापमान ३५ अंशावर असल्यामुळे दिवसा उकाडा जाणवत आहे. From November, the intensity of cold will increase


एकीकडे दिवसा वाढती ऑक्टोबर हीट तर दुसरीकडे रात्री कमी होणारे तापमान अशी स्थिती सध्या राज्यात आहे. समुद्राच्या पाण्याच्या तापमानात फारसा फरक दिसून येत नसल्याने थंडीवरही फारसा परिणाम जाणवणार नसल्याने यंदा थंडी राहणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले. तापमानाच्या चढ-उताराचा थंडीवर परिणाम होतो. दस-यानंतर सकाळच्या तापमानात घट होईल तर कमाल तापमान सरासरीएवढेच असेल. १५ नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज साबळे यांनी वर्तवला आहे. थंडी किंवा कोणत्याही तापमानाच्या अंदाजाचे काही निकष असतात. समुद्राच्या पाण्यातील तापमान हे एकूण तापमानावर फार मोठा परिणाम करत असते. जवळपास १/३ जमीन आणि १/४ पाणी आहे. पाणी उशिरा तापते अन् उशिरा थंड होते. तर जमिनीचं गणित याच्या उलट. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. From November, the intensity of cold will increase