विजयादशमीनिमित्त तवसाळ ग्रामस्थांचा उपक्रम
गुहागर : विजयादशमीच्या निमित्ताने तालुक्यातील तवसाळ येथील विजय गड किल्ल्याचे पूजन (Fort Pooja of Vijaygad) करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान, गुहागर विभाग आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्यावतीने दूर्ग पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विजयगड फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान गुहागर विभाग आणि तवसाळ ग्रामस्थांनी विजयादशमीला दूर्ग पूजनाचा अभिनव कार्यक्रम केला. इतिहासाचा साक्षीदार असणारा विजयगड किल्ल्यावर हा कार्यक्रम झाला. विजयगड किल्ला फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि गडाचे पूजन उपस्थितांनी केले.
यावेळी तवसाळ ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप सुर्वे, उपसरपंच प्रसाद सुर्वे, रत्नदीप गडदे, प्रणय सुर्वे, अमोल सूर्वे, प्रीतम सूर्वे, जयेश गडदे, पुष्पराज सुर्वे, संकेत गंधेरे, मनोज कांबळे, महेश सुर्वे आदी प्रमुख ग्रामस्थांसह सह्याद्री प्रतिष्ठानचे चंद्रकांत चांदोरकर, जोत्स्ना चांदोरकर, अंकिता चांदोरकर, किरण पोमेंडकर, नयन चांदोरकर, धनश्री चांदोरकर, नितेश चांदोरकर, प्रमोद आग्रे, प्रथमेश अवेरे, चंद्रकांत शिंदे, शैलेश भुवड आधी दूर्ग सेवक उपस्थित होते. विजयादशमीच्या मुहूर्तावर तवसाळ येथील विजय गडावर झालेले दूर्ग पूजन हे ग्रामस्थ बंधू-भगिनी आणि शिवप्रेमींमध्ये चैतन्य निर्माण करणारे होते.