गुहागर, ता. 02 : रामपूर बैकरवाडी बस थांब्याजवळ मांडूळ जातीच्या सापाची (Mandul Snake, Indian sand boa) तस्करी (Smuggling) करणाऱ्यांना वन विभागाने (Forest Department) कारवाई केली. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मांडूळ जातीच्या सापांना संरक्षण देण्यात आले आहे. गुप्त धनाच्या लालसेपोटी या सापाची तस्करी करण्यात येते.
दुतोंड्या, दोन तोंडे असलेला साप म्हणून ओळख असलेला मांडूळ बिनविषारी, निशाचर, अत्यंत संथ गतीने चालणारा साप आहे. हा साप उष्ण कटीबंधीय प्रदेशात आढळतो. स्वाभाविकपणे संपूर्ण भारतात हा साप दिसून येतो. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी, गुप्तधन शोधून काढण्यासाठी मांडूळ जातीचा साप उपयोगी पडतो. अशा अनेक अंधश्रध्दा आहेत. त्यामुळे या सापाला त्याच्या लांबी व वजनाप्रमाणे बाजारात 50 हजारांपासून 3 लाखापर्यंत किंमत मिळते.
गुहागर (Guhagar) चिपळूण मार्गावरील रामपूर ते गणेशखिंड दरम्यान मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती आज (2 ऑक्टोबर) वनखात्याला मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर दिपक खाडे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी आणि सचिन निलख सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, चिपळूण परिमंडळ वन अधिकारी दौलत भोसले, गुहागरचे परिमंडळ वन अधिकारी संतोष परशेट्ये, वनरक्षक यशवंत सावर्डेकर, अरविंद मांडवकर, संजय दुंडगे या टीमने सापळा रचला.
2 ऑक्टोबरला दुपारी 12 च्या दरम्यान काही व्यक्ती रामपूर बैकरवाडी येथील एस.टी. स्टॉपजवळ रिक्षामधुन जात होत्या. त्यांच्याबाबत संशय आल्याने वन विभागाच्या टीमने त्यांची चौकशी केली. त्यावेळी रिक्षामध्ये प्लॅस्टिक गोणपाटाची पिशवी दिसली. ही पिशवी तपासली असता त्यामध्ये मांडूळ जातीचा साप सापडला. त्यामुळे वन विभागाच्या टीमने चिपळूण तालुक्यातील शिरवली येथे रहाणारे महादेव जयराम महाडिक व अनिल तुकाराम कदम तसेच रिक्षाचालक लक्ष्मण हिरू चाळके (रा. काविळतळी, चिपळूण), यांना ताब्यात (arrested) घेतले. तसेच रिक्षा जप्त केली. या तिघांवर (smuggler) वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,48,50,51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील चौकशी चिपळूणच्या परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर करीत आहेत.
मांडुळ जातीच्या सापाची तस्करी का होते हे वाचण्यासाठी क्लिक करा.
हे देखील वाचा : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दिल्लीत गौरव