कोकणातील जमीनमालकांना साथ साथ ट्रस्टचे आवाहन
गुहागर, ता. 24 : हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी जंगलांची निर्मिती हा एकच पर्याय मनुष्यासमोर आहे. त्यामुळे आपल्या ओसाड पडलेल्या जागांवर जंगलाच्या निर्मितीतून ऑक्सिजन देणारी झाडे लावण्याचा उपक्रम साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने हाती घेतला आहे. जागेच्या मालकी हक्कात कोणताही बदल न करता झाडे लावणे, देखभाल करणे हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे शरद जोशी यांनी सांगितले.
The only option for humans is to create forests to maintain the right amount of oxygen in the air. The Sath Saath Charitable Trust has undertaken the task of planting trees. Without any change in the ownership of the land Sath Sath Charitable Trust will do Plantation and Maintains of Trees Said Sharad Joshi, Main Trustee of Sath Sath.
जोशी म्हणाले की, साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने या उपक्रमाचा पहिला प्रयोग वेळणेश्र्वरमधील एका ओसाड जागेत केला. कोकणातील जंगलात असणारी वड, पिंपळ, जांभुळ, हरडा, बेहडा, चिंच आदी 400 झाडे लावली. दोन वर्षांनंतर यापैकी 100 झाडे जगल्याचे लक्षात आले. या ट्रस्टने त्याच्या मालकीच्या जागेतही असाच प्रयोग केला. हा प्रयोग करताना सुरवातीपासून झाडांची देखभाल केली. त्यामुळे कातळावरही खड्डे मारुन झाडे लावली तर अधिक झाडे जगतात असे लक्षात आले. दोन ठिकाणचे प्रयोग यशस्वी झाल्यावर साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने हा उपक्रम अभियान म्हणून राबविण्याचे निश्चित केले आहे.