• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अन्न व औषध प्रशासनाची गुहागर मध्ये धडक कारवाई

by Mayuresh Patnakar
August 15, 2026
in Guhagar
236 2
3
Food and Drug Administration takes action in Guhagar
463
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विनापरवाना चिकन सेंटरवर दंडात्मक कारवाईसह व्यवसाय बंदची नोटीस

गुहागर, ता. 15 : तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक तपासणी मोहीम सुरू केली असून, अन्न सुरक्षा अधिकारी परदेशी मॅडम यांच्या पथकाने काल शृंगारतळी येथे एका विनापरवाना चिकन सेंटरवर मोठी कारवाई केली. संबंधित चिकन सेंटरकडे अन्न सुरक्षा परवाना (License) नसल्याचे आढळल्याने परदेशी मॅडम यांनी त्यांना दंड ठोठावला असून, व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या कडक कारवाईनंतर संबंधित व्यवसायिकाने आज तातडीने रीतसर नोंदणी करून परवाना काढून घेतला आहे. Food and Drug Administration takes action in Guhagar

या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी परदेशी मॅडम आणि त्यांच्या पथकाने गुहागर चौपाटीवरील स्नॅक्स सेंटर आणि इतर छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही कसून तपासणी केली. यावेळी व्यवसाय करताना पाळावयाचे स्वच्छतेचे व अन्न सुरक्षेचे नियम विक्रेत्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच शहरातील एका हॉटेलचीही अन्न सुरक्षा मानांकनानुसार तपासणी करण्यात आली. Food and Drug Administration takes action in Guhagar

तालुक्यातील इतर सर्व खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आणि व्यावसायिक केंद्रांचीही आगामी काळात टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी परदेशी मॅडम यांनी सांगितले. त्यामुळे गुहागर तालुक्यातील ज्या छोट्या-मोठ्या अन्न व्यवसायिकांनी अद्याप आपली नोंदणी केलेली नाही किंवा परवाना घेतलेला नाही, त्यांनी कोणतीही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. Food and Drug Administration takes action in Guhagar

Tags: Food and Drug Administration takes action in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share185SendTweet116
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.