छोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती; मंदार सावंतदेसाई
रत्नागिरी, ता.17 : भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आज प्रत्येक गोष्टीशी संबंध येतो. त्यामुळे आपण काय करणार हे ध्यानी घेतले पाहिजे. घरोघरी तिरंगा लावण्याच्या अभियानातून देशभक्ती जागृत झाली आहे. आपणही अनेक छोट्या गोष्टीतून देशभक्ती जागवू शकतो. वर्गात शिक्षक आले नाहीत तर शिस्त पाळली पाहिजे. पेपर लिहिताना कॉपी करू नये. वाहतूक पोलिस नसताना सिग्नल तोडून गाडी हाकू नका. हेल्मेट स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. ते वापरले पाहिजे. आपण तारतम्य बाळगले तर देशभक्तीचा आविष्कार दिसेल, असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे शिरगाव प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी केले. Flag Hoisting at Maharshi Karve Institute


कर्वे शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, १८५८ मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी मुलाला पाठिशी बांधून इंग्रजांशी दोन हात केले. सुराज आपल्याला हवे आहे, असे जाहीर केले. तर १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य मिळवणारच ही गर्जना केली. सुराज ते स्वराज्य असा हा प्रवास आहे. भविष्याकडे जाताना या गोष्टींचे स्मरण केलेच पाहिजे. भारतीय इतिहासात या दोन्ही गोष्टी मैलाचा दगड ठरल्या. अनेकांनी बलिदान दिले आहे. स्वराज्य मिळताना काय काय घटना घडल्या त्याचे स्मरण केले पाहिजे. Flag Hoisting at Maharshi Karve Institute


या वेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष राजेंद्र घाग, क्लबचे ५५ वर्ष सदस्य असणारे सर्वांत ज्येष्ठ धरमसी चौहान, नीलेश मुळ्ये, सौ. मुळ्ये, सचिन सारोळकर, नीलेश पावसकर, राजीव देवळे, रूपेश पेडणेकर, आदी पदाधिकारी तसेच कर्वे शिक्षण संस्थेचे सदस्य आनंद पंडित, प्रकाश सोहनी, शिल्पा पानवलकर, आदिती देसाई, डॉ. राजीव सप्रे, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, बीसीए कॉलेजच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर उपस्थित होते. सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्रतिभा लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. Flag Hoisting at Maharshi Karve Institute


कॉलेज तिरंगामय
बीसीएच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांतील विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी, पोस्टर्स साकारली. या प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष राजेंद्र घाग यांनी केले. तसेच संपूर्ण महाविद्यालयात तिरंग्याच्या रंगांतील फुगे, कागदापासून फुले, हस्तकलेच्या वस्तू, ओरिगामी कलेतून सजावट केली होती. या सर्व उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. या वेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. Flag Hoisting at Maharshi Karve Institute