गुहागर, ता. 28 : दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी कालावधीनंतर मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात होत असल्यामुळे सध्या मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आल्यामुळे शासन त्यावर काय निर्णय घेते, याकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे. Fishermen ready to sail the sea
मच्छीमार वसाहतीत सध्या होड्यांची डागडुजी, रंगकाम, इंजिन तपासणी, जाळींची विणाई, खाद्यव इंधन साठवणूक, बर्फाची तयारी, खलाशांची जमवाजमव अशा कामांत मच्छीमार व्यग्र आहेत. प्रत्येक होडी समुद्रात उतरवण्यापूर्वी तिची पूर्णपणे तयारी आणि सुरक्षितता पाहणे अत्यंत आवश्यक असते. Fishermen ready to sail the sea

कोळी समाज धार्मिक परंपरांशी निष्ठावान असल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला श्रावण महिना सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी श्रावण महिन्यातील सप्ताह सुरू झाले आहेत. विशेष पूजाअर्चा, खेमदेवाला प्रार्थना आणि शुभ मुहूर्त ठरवूनच होड्या समुद्रात सोडल्या जातात. समुद्र शांत राहावा, भरपूर मासळी मिळावी आणि कोणतेही अपघात घडू नयेत यासाठी मच्छीमार समाजाकडून विधिवत व धार्मिक कार्यक्रम करण्याची तयारीही सुरू झाली आहे. मागील हंगामात मे महिन्याच्या 20 तारखेपासून अचानक आलेल्या पावसाने मच्छी व्यवसायाला फटका बसलेला होता. त्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले होते. मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. सामान्यतः 15 ऑगस्टच्या आसपास मासेमारी हंगाम सुरू होतो. मात्र यंदा पावसाने समाधानकारक लवकर हजेरी लावून नंतर गायब झाला. परंतु कालपासून पावसाने सुरुवात केल्यामुळे यंदाच्या हंगामावर पावसाचे सावट दिसत आहे. हवामान विभागाकडून, अजून 3 दिवस मुसळधार पाऊस राहील, असे जाहीर केल्यामुळे 1 ऑगस्टपासून वातावरण पोषक होईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी तीन दिवस आधी मासेमारीला जाण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. Fishermen ready to sail the sea