फक्त 22 जागा, प्रवेशासाठी काटेकोर नियम
रत्नागिरी दि. 16 : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत 01 जुलै 2021 पासून मच्छिमार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी 30 जुन 2021 पर्यंत स्वत:च्या हस्ताक्षरातील आपले अर्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, कार्यालय रत्नागिरी येथे पाठवावेत. विहीत नमुन्यातील छापील अर्ज याच कार्यालयात मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अशी माहिती मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी दिली आहे.
Fisheries Training on boating principles, use of fishing equipment and maintenance of marine diesel engines will be imparted to the young fishermen from 01 July 2021 through Fisheries Training Officer, Ratnagiri. Those who want to avail this training should send their applications in their own handwriting to the Fisheries Training Officer, Office Ratnagiri by 30th June 2021. Arrangements have been made to get the printed application in the prescribed form at this office. Applications received after the deadline will not be considered. Such information has been given by the Fisheries Training Officer.
मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राद्वारे नौका नयनाची तत्वे, मासेमारी अवजारांचा वापर आणि मरीन डीझेल इंजिनची देखभाल व निगा याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग 01 जुलै 2021 पासून सुरु होणार आहेत. केवळ 22 प्रशिक्षणार्थींनाच या प्रशिक्षणासाठी निवडण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेसाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राद्वारे काही अटी ठेवण्यात आल्या आहे. या अटींमध्ये पात्र असणाऱ्यां उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर प्रवेश निश्चिती होईल.
प्रशिक्षणासाठी अटी
- उमेदवार मच्छिमार समाजातील अथवा ज्यांनी मच्छिमारी धंदा गेली काही वर्षे पासून अंगिकारला आहे अशापैकी असावा. तसा अनुभव असल्याबदल तलाठी किंवा मच्छिमारी सहकारी संस्था अथवा मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्याचे शिफारसपत्र सोबत जोडावे. (छायाप्रत म्हणजेच झेरॉक्स).
- उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षाचे आत असावे. तसेच प्रकृतीने कणखर असणाऱ्या, मेहनतीचे काम करू शकणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत. (जन्म तारखेच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत).
- उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता चौथी पास असून त्याला उत्तम प्रकारे मराठी लिहिता व वाचता आले पाहिजे. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. (शैक्षणिक पात्रतेच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत).
- प्रत्यक्ष समुद्रावरील मासेमारीचा अनुभव असणे जरुरीचे आहे. पोहता येणे व समुद्रावर सफरीस गेल्यास सुस्थितीत राहू शकणे अत्यावश्यक.
- मच्छिमारी सहकारी संस्थेचे शिफारसपत्र व सभासद असल्याची पावती (झेरॉक्स प्रत) जोडणे.
- रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनाच प्राधान्य राहिल. अन्य जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार मा. आयुक्त,मत्स्यव्यवसाय खाते, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे विचाराधीन राहील. (तलाठी/पोलीस पाटील/सरपंच यांचा रहिवाशी असल्याबाबतचा दाखला.)
- उमेदवारांनी स्वत:चा अर्ज मच्छिमारी संस्थेकडे नोंदवून नंतर या कार्यालयाकडे सादर करावा.
- वरील अटींप्रमाणे ज्या उमेदवाराचा अर्ज परिपूर्ण असेल त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. परिपूर्ण नसेल ते अर्ज दप्तरदाखल करण्यात येतील. अर्ज परत दिला जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारास या कार्यालयाशी एक करारनामा करावा लागेल.
- विशेष जाती जमातीकरिता एकूण २२ उमेदवारांपैकी २ जागा राखीव असून सदर उमेदवाराचे अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेमार्फत पाठविण्यात यावेत.
- निवड झालेल्या उमेदवारांपैकी दारिद्रय रेषेखालील उमेदवारांस दरमहा रु. १००/- सेवाशुल्क (फी) व दारिद्रय रेषेवरील उमेदवारास दरमहा रू.४५०/- सेवाशुल्क(फी)भरावी लागेल.
मच्छीमार संस्थेने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यास केंद्रातील त्याच्या गैरहजर, गैरवर्तन, इत्यादी बाबत योग्यवेळी दखल न घेतल्यास त्याचे प्रशिक्षण तात्काळ समाप्त केले जाईल. त्यामुळे मच्छीमार संस्थेने पुरस्कृत करण्यापूर्वीच त्याची योग्यता पडताळून पहावी. निवड झालेल्या उमेदवारास सागरी जोखमीचे विमा संरक्षण घ्यावे लागेल. स्मार्टकार्ड किंवा स्मार्टकार्डसाठी केलेल्या अर्जाची झेरॉक्स आवश्यक आहे.