रत्नागिरी, ता. 26 : तटरक्षक दलाच्या पश्चिम तटाचे प्रमुख अतिरिक्त महानिर्देशक के आर सुरेश यांनी रत्नागिरीचा दौरा केला. यावेळी त्यांनी रत्नागिरीस्थित तटरक्षक दलाच्या किनारी आणि सागरी यूनिट्सच्या कार्य तत्परतेबाबत आणि चालू व प्रस्तावित विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. First ship repair project in Ratnagiri

रत्नागिरी येथील तटरक्षक दलाद्वारा उभारण्यात येणारा टॅवल लिफ्ट आणि बर्निंग सुविधा असलेला जहाज दुरूस्ती केंद्र हा या दौऱ्यातील केंद्रबिंदु होता. तटरक्षक दलातर्फे उभारण्यात येणारा हा पहिलाच जहाज दुरुस्ती प्रकल्प आहे. फ्लॅग अधिकार्याद्वारे जवानांना केलेल्या संबोधनात त्यांनी तटरक्षक दलाच्या कर्तव्यांच्या सनदेतील कार्यांच्या निर्वाहनासाठी सागरी आणि हवाई प्रयत्नांना मजबूत करण्याच्या उपायांवर भर दिला. First ship repair project in Ratnagiri
