अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत महाराष्ट्रातील 15 प्रशिक्षणार्थी अव्वल
गुहागर, ता. 26 : भारत सरकार ने घेतलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा (AITT) जुलै 2025 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मायनाक भंडारी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील साहिल जयश्री श्रीराम गायकवाड या प्रशिक्षणार्थीने 100 टक्के गुण मिळवले आहेत. अशी कामगिरी करणारा गुहागर आयटीआयमधील (Guhaga ITI) साहील गायकवाड हा जिल्ह्यातील एकमात्र प्रशिक्षणार्थी आहे. महाराष्ट्रातील 15 प्रशिक्षणार्थीनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. देश पातळीवरील या स्पर्धा परीक्षेला 20 लाखाहून विद्यार्थी बसले होते. Sahil ranks first in the district
Sahil ranks first in the districtऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रशिक्षणार्थीसाठी भारत सरकारतर्फे घेतलेल्या जाणाऱ्या या AITT स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे ही अभिमानाची बाब असते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनियरींग पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळणे सुलभ होते. गुहागरमधील मायनाक भंडारी आयटीआयमधुन अव्वल गुणांनी उत्तीर्ण होणारा साहील गायकवाड हा पहिला विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या परीक्षेत 600 पैकी 600 गूण मिळविणारा साहील हा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे. त्याच्या या यशामुळे मायकान भंडारी आयटीआयच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Sahil ranks first in the district

साहीलने मिळविलेल्या यशाबद्दल आयटीआयमध्ये विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुण प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख बक्षिस व पुष्पगुच्छ देऊन साहीलचा सत्कार करण्यात आला. तसेच त्याला प्रशिक्षण देणाऱ्या विजतंत्री शिल्पनिदेशिका सौ. समीक्षा धामणस्कर, गणित , ई.एस. विषयाच्या निदेशिका सौ. शिल्पा भोसले, इंजिनियरिंग ड्रॉइंग विषयाचे दिपक धनावडे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्रीतम शेट्ये , संस्था व्यवस्थापन समिती सदस्य समीर घाणेकर, गट निदेशक पी. डी. गुरखे, ए .बी. गोरे, मुख्य लिपीक प्रदीप साळवी , ज्येष्ठ शिल्प निदेशक चंद्रशेखर शेंडे, आर. सी. मानकर, संजय पालकर यांच्यासह आयटीआयमधील सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते. Sahil ranks first in the district

सत्काराचे वेळी मनोगत व्यक्त करताना साहिलने इलेक्ट्रीकल इंजिनियर (बी.ई) होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या अभ्यासक्रमात यशस्वी झाल्यास आयआयटी महाविद्यालयातून एम.टेक. पूर्ण करण्याचे स्वप्न असल्याचेही त्याने सांगितले. Sahil ranks first in the district
महाराष्ट्रातील 15 प्रशिक्षणार्थींनी मिळवले 100 टक्के गुण
भारत सरकार ने घेतलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2025 मध्ये गुहागरच्या मायनाक भंडारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील साहील गायकवाड या प्रशिक्षणार्थीने 100 टक्के गुण मिळविले. त्याचबरोबर यवतमाळ शहरातील आयटीआयमधील 11 विद्यार्थी नोमन अहमद, वैष्णवी भोयर, महेश नेमाडे, विशाल माटलवाड, विशाल कदम, आदित्य सोळंखे, जुईनी राठोड, कार्तिक दिघे, साक्षी कलपांडे, रुचिता धुमणे, पायल मनवार, दारव्हा (जि. यवतमाळ) मधील विद्यार्थीनी नम्रता खामकर, मुंबई उपनगरातील खासगी आयटीआयचा विद्यार्थी, डॉन बॉक्सो अफजल मुस्तफा कादरी, मंगलुरपीर (जि. वाशिम) मधील विद्यार्थीनी प्रतिज्ञा मनवार यांनी देखील 100 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. Sahil ranks first in the district