गुहागर, ता. 26 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी टीडब्ल्यूजे हेल्थकेअर असोसिएशनच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टीडब्ल्यूजे हेल्थकेअर विभागाचे मेडिकल ऑफिसर श्री शुभम कुशे व त्यांच्या सहकारी प्रियांका सकपाळ उपस्थित होत्या. First Aid Training in Regal College Shringartali


या कार्यक्रमामध्ये प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे मॅडम यांनी श्री कुशे सर यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. कुशे सर यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रथमोपचार म्हणजे काय व त्याचा वापर करून आपण एखाद्या व्यक्तीचा प्राण कसा वाचवू शकतो, हे सांगितले. यामध्ये त्यांनी प्रथमोपचार करून संभाव्य जखम टाळता येते, आयुष्य वाचवता येते व यामुळे रुग्णामध्ये लवकर सुधारणा होण्यास मदत होते असे सांगितले. रुग्ण धुरामुळे गुदमरल्यास तसेच श्वसन नलिकेमध्ये काही अडकल्यास काय प्रथमोपचार करता येऊ शकतात ते प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. यामध्ये रुग्णाला कुशीवर झोपवणे तसेच सीपीआर देणे यांचा समावेश होता. रुग्ण बुडत असल्यास, मानसिक धक्का बसल्यास,आकडी आल्यास,अपघातग्रस्त झाल्यास व आग लागल्यास प्रसंगावधानता बाळगत जुनाट उपचार न करता प्रसंगानुरूप कोणते प्रथमोपचार करावे ते श्री. कूशे यानी प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. आपल्या व्याख्यानामध्ये शेवटी कोणत्याही आपत्तीमध्ये आपण नुसती बघ्याची भूमिका न घेता रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला पाहिजे. हे त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणातून पटवून दिले. First Aid Training in Regal College Shringartali


या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज, शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री चौगुले सर यांनी केले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सौ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. First Aid Training in Regal College Shringartali

