लोटे एमआयडीसी मधील घटना, तीन तासांनी आग आटोक्यात
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील (Lote MIDC) प्रिव्ही
ऑरगॅनिक (Privhi Organic) या कंपनीच्या गोडाऊनला शनिवारी रात्री 3.30 च्या दरम्यान आग (fire in chemical factory) लागली. यावेळी गोडाउन मध्ये कोणी नसल्याने जिवीतहानी टळली. एका कामगाराला वायुची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अग्निशमन दलाला तीन तासांच्या अथक प्रयत्नामुळे रविवारी सकाळी 6.30 पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. (fire in chemical factory)

प्रिव्ही स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड (पूर्वीची फेअरकेम स्पेशालिटी लिमिटेड) ही भारतातील सुगंधी रसायनांची (Aroma Chemicals) उत्पादक, पुरवठादार आणि निर्यातदार कंपनी आहे. या कंपनीची उत्पादने बनवणारी एक शाखा लोटे एमआयडीसीत प्रिव्ही ऑरगॅनिक या नावाने आहे . या कंपनीच्या गोडावून मध्ये ज्वालाग्राही रासायनिक पदार्थ ( Solvent) तसेच अन्य रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक अन्य रासायनिक घटक ठेवलेले असतात. अचानक लागलेल्या आगीत कंपनीचे गोडावून जळून खाक झाले. (fire in chemical factory)

आग लागल्याचे कळताच एमआयडीसीचे दोन अग्निशामक बंब आणि चिपळून, खेड नगरपालिकेचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. ज्यावेळी गोडावूनला आग लागली तेव्हा कंपनीमध्ये रात्रपाळी चे कामगार काम करीत होते. अग्निशमन दलाच्या जवानासह कंपनी व्यवस्थापनाने सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. मंगेश पवार नामक कामगाराला वायुबाधा झाल्याचे समजते. त्या कामगाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंपनीजवळ अशोका कंपनीचे सीएनजी गँस स्टेशन असल्याने आणखी मोठी दुर्घटना घडेल की काय अशी भीती सर्वांना वाटत होती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे दुसरी दुर्घटना टळली. रविवारी सकाळी 6.30 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. (fire in chemical factory)