गुहागर तालुक्यात 6 गावात 8 घरांचे नुकसान
गुहागर, ता. 18 : सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील आठ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीची किंमत 1 लाख 39 हजार 50 रुपये असून तलाठी आणि ग्रामसेवकांनी सर्व घरांचा पंचनामा केला आहे.
तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. 16 जून ला सरासरी 109.4 मिमि, 17 जूनला 146.2 मिमि पाऊस पडला. 17 जूनला तालुक्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली. केवळ 29.8 मिमि. पाऊस पडला. या पावसामुळे पालशेत व अंजनवेल येथील बाजारपुलावरुन पाणी वहात होते. सतत पडणारा पाऊस आणि मे महिन्यात झालेले वादळ यांचा दुहेरी फटका काही घरांना बसला. वादळात पिळवटून निघालेल्या, अर्धवट मोडलेल्या फांद्या सलग पडणाऱ्या पावसामुळे घरांवर पडल्या. पडवे येथील शशिकांत रामचंद्र सुर्वे यांच्या घरावर झाडाची फांडी पडून 69 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पडव्यातील समजाद रशिद शिरगांवकर यांच्या घरावरही फांदी पडून 10 हजार रुपयांचे आणि कैसर रमजान शिरगांवकर याच्या घराचे 9 हजाराचे नुकसान झाले आहे. अडूर येथील सुरेश काशिनाथ रसाळ यांच्या घराचे 25 हजारांचे व काशिनाथ भिवा रसाळ यांच्या घराचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मळणमधील गंगा गणु आलीम यांच्या घराच्या पडवीत कौले पडून 2 हजार 350 रुपयांचे, काजुर्लीतील अमिता अनंत डिंगणकर याच्या पडवीची कौले पडून 2 हजार 50 रुपयांचे व पांगारतील राजेश रामचंद्र बेंडल याच्या घरावरील कौले पडून व वासा मोडून 6 हजार 250 रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सरासरी 43.33 मिमी पावसाची नोंद
18 तारखेला सकाळी घेतलेल्या नोंदींप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 43.33 मिमी तर एकूण 390.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 75.80 मिमी , दापोली 12.10 मिमी, खेड 77.80 मिमी, चिपळूण 39.80 मिमी, संगमेश्वर 55.90 मिमी, रत्नागिरी 23.90 मिमी, राजापूर 20 मिमी,लांजा 54.60 मिमी.
जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 18 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
दापोली तालुक्यात मौजे पाजपंढरी येथे भागवत हरीचंद्र पावसे यांचे घरांचे पावसामुळे अंशत: नुकसान 15 हजार रुपये नुकसान झाले आहे. मौजे शिरसोली येथील काशिनाथ बाळा जाधव यांचे घराचे पावसामुळे अंशत: 4 हजार 400 रुपये नुकसान झाले आहे. मौजे शिरसोश्वर येथील बाळाराम रामजी डेवणकर यांचे घराचे पावसामुळे 3 हजार 950 एवढे नुकसान झाले आहे. मौजे शिरासोली येथे दिनकर विष्णू जाधव यांचे घराचे पावसामुळे 1 हजार 600 रुपये नुकसान झाले आहे. मौजे शिरसाडी येथील वसंत काशिनाथ वाजे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 2 हजार 800 रुपये नुकसान झाले आहे. मौजे गिम्हवणे येथील चांदणी चंद्रकांत यादव यांचे घराचे पावसामुळे अंशत: 8 हजार 450 रुपये नुकसान झाले आहे. मौजे माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: 4 हजार 500 रुपये नुकसान झाले आहे.
चिपळूण तालुक्यात मौजे कळकवणे-आकणे-तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली होती. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम चालू. पर्यायी रस्ता आकळे-कादवड-तिवरे रस्ता चालू आहे. मौजे टेरव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: 24 हजार रुपये नुकसान झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात मौजे कुचांबे येथील राजू गोविंद काजवे यांचे घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे पांगरी येथील सूर्यकांत सागवेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 5 हजार 400 रुपये नुकसान झाले आहे. मौजे पुरे देवळे बौध्दवाडी येथील सिध्दार्थ पवार यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे तुळसणी येथील जलऊदीन अस्ली बोट यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पक्क्या विहीरीचे पावसामुळे अंशत: 1 लाख 50 हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. मौजे तुळसणी येथील ग्रामपंचायत जवळील मोरीचे पावसामुळे कोसळून अंशत: नुकसान झाले आहे.