गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील गिमवी गावा शेजारील एका गावातील सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनेने याबाबत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग करणारा सासरा हा सर्वांना सुपरिचित आहे. गेले अनेक दिवसांपासून त्याचे असे प्रकार सुरू होते. यावर कुटुंबात बैठक होऊन सासऱ्याचा माफीनामाही झाला. Father in law molested daughter in law


मात्र आपल्या सवयीतून न सुटलेल्या या सासऱ्याने आपल्या सुनेवरची वक्रदृष्टी कायम ठेवली. तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या या सासऱ्याची वाईट सवय जात नव्हती. जाता येता आपल्या सुनेला कोपर लावणे, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे असे प्रकार सुरू होते. काही दिवसापूर्वी त्याने हा प्रकार केल्याने त्रस्त झालेल्या सुनेने अखेरीस गुहागर पोलीस ठाण्यामध्ये आपल्या सासऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्याचा मुलगा हा मुंबईमध्ये नोकरीच्या शोधानिमित्त गेला होता. परंतु सासऱ्याच्या या जाचाला कंटाळून अखेर सुनेने गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सासऱ्याविरोधात बी. एन. एस. 75, 76 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. Father in law molested daughter in law

