आमदार श्री.शेखर निकमांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : माजी मंत्री गुहागर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांच्या चिपळूण येथील “सुवर्ण भास्कर” निवासस्थानी दिवाळी पाडवा सणाचे औचित्य साधून श्री.सत्यनारायणाची महापुजा व “फराळ स्नेहबंधाचा” हा कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. “Faral Snehabandha” program at MLA Jadhav’s residence
यावेळी उपस्थित सर्वांनी “श्री.सत्यनारायण महापूजेचा” आणि तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला व “फराळ स्नेहबंधाचा” आस्वाद घेतला. या सर्वांचे आ. भास्करशेठ जाधव यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करुन धन्यवाद दिले. यावेळी सौ.सुवर्णाताई भास्कर जाधव, श्री.समिरदादा जाधव, श्री.विक्रांत दादा जाधव, आम.भास्कर जाधव यांचे स्वियं सहाय्यक श्री.संतोष तांदळे यांचेसह जाधव परिवाराने हा कार्यक्रम नियोजनबद्ध यशस्वी केला. “Faral Snehabandha” program at MLA Jadhav’s residence
यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुहागर तालुका प्रमुख श्री.सचिनशेठ बाईत, तालुका सचिव श्री.विलास गुरव, आबलोलीचे शाखा प्रमुख श्री.संदिप निमूणकर, निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे सदस्य व व्यापारी संघटना आबलोलीचे अध्यक्ष श्री.ऋषीकेश बाईत, पत्रकार श्री.संदेश कदम, पिंटू निमुणकर, शरद आंबाडे, खोडदे येथील जेष्ठ शिवसैनिक श्री.काशिनाथ मोहिते, विनायक मुळे, सौ.नेत्राताई ठाकूर, आमदार शेखर निकम यांचेसह चिपळूण व गुहागर तालुक्यातील महिला पुरुष हजारो कार्यकर्त्यांनी, मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. “Faral Snehabandha” program at MLA Jadhav’s residence