गुहागर, ता. 28 : गुहागर तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व मुलासह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर आज गुरुवारी सकाळी त्यांचा माण तालुक्यातील गोंदवले महाराज मठ परिसरात शोध लागला आहे. Family of missing teacher from Guhagar found

चव्हाण कुटुंब दर्शनासाठी गोंदवले येथे आले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. स्थानिकांनी त्यांना ओळखताच संबंधित अधिकाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क होऊन ते सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. चव्हाण कुटुंब गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे निघाले होते. मात्र, २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चिपळूण परिसरात असताना त्यांचा अचानक संपर्क तुटला होता. मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संवाद साधता न आल्याने नातेवाईकांनी तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज सकाळी त्यांचा सुखरूप शोध लागल्याने नातेवाईक, सहकारी शिक्षक व गावकऱ्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. प्रशासनानेही त्यांच्या सुखरूप शोध लागल्याची पुष्टी केली आहे. Family of missing teacher from Guhagar found