• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 January 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर मासू शाळेत नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिर

by Guhagar News
December 9, 2025
in Guhagar
63 1
2
Eye check-up camp
125
SHARES
356
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

समता फाउंडेशन, वालावकर रुग्णालय डेरवण, ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक यांचा स्तुत्य उपक्रम

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील मासू बुद्रुक येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मासू नं. 1 या शाळेत समता फाउंडेशन, भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय डेरवण, तालुका चिपळूण आणि ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता ते दुपारी 02 :00 वाजता  नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नि :शुल्क नेत्र तपासणी शिबिराचा मासू पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन ग्राम विकास मंडळ मासू बुद्रुक या मंडळाचे अध्यक्ष विजय मसुरकर यांनी केले आहे. Eye check-up camp

Eye check-up camp

या नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिर ( मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिर ) आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची 1) निशुल्क तपासणी व योग्य सल्ला मार्गदर्शन केले जाईल. 2) मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय डेरवण येथे नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल. 3) मोतीबिंदू रुग्णांची ने – आण करण्याची राहण्याची, जेवणाची, व काळ्या चष्म्याची नि :शुल्क सोय करण्यात येईल. 4) मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना भरतीची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल. Eye check-up camp

हे नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक या मंडळाचे अध्यक्ष विजय मसुरकर, उपाध्यक्ष लक्ष्मण मास्कर, सरचिटणीस मंगेश मास्कर, चिटणीस देवजी डिंगणकर, विजेंदर सुनील नाचरे, सर्व खजिनदार गंगाराम आलीम, सदस्य महादेव नाचरे, दिनेश नाचरे, नंदकुमार आलिम, धाकू आलिम, यशवंत आलीम, अशोक मास्कर, प्रभाकर मास्कर, बबन नाचरे, सल्लागार पांडुरंग नाचरे, रामचंद्र मास्कर, बाबु नाचरे, सखाराम मास्कर, शेखर आलिम आदी कार्यकर्ते पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत. Eye check-up camp

Tags: eye check-up campGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet31
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.