• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

HSRP नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनचालकांसाठी मुदतवाढ

by Manoj Bavdhankar
August 16, 2025
in Bharat
85 1
0
Extension of deadline for HSRP number plate
167
SHARES
476
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ता. 16 : राज्य शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने HSRP नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या वाहनमालकांनी यापूर्वी HSRP साठी नोंदणी केली नाही, त्यांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी. 1 डिसेंबर 2025 नंतर HSRP नसलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. Extension of deadline for HSRP number plate

ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत आहेत, त्यांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 होती. पण वाहन मालकांकडून प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे राज्य सरकारने अखेर आता मुदत वाढवली आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. HSRP प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर, 1 डिसेंबर 2025 पासून वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई केली जाईल, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. Extension of deadline for HSRP number plate

परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसवावी. ज्यांच्याकडे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉइंटमेंट आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर HSRP प्लेटसाठी नोंदणी करा,” असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, “जुन्या परिपत्रकानुसार HSRP न बसवलेल्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर निर्बंध लावण्यात आले होते. यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे (योग्यंता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबवण्यात यावीत. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येऊ नये,” असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं. Extension of deadline for HSRP number plate

Tags: Extension of deadline for HSRP number plateGuhagarGuhagar NewsHSRP नंबरप्लेटLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.