गुहागर, ता. 19 : लो.स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या माध्यमातून कै.अर्जुनराव भागडे यांच्या स्मरणार्थ कीर्तनवाडी येथे कोकणी पापड महिला गृह उद्योग गटाला पापड मशीन भेट देण्यात आली. यावेळी उद्घाटन आणि महिलांना प्रशिक्षक देण्यात आले. महिलांना रोजगार मिळवा या उद्देशाने लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान ही संस्था कायम कार्यरत असते. याच उद्देशाने गुहागर मधील कीर्तनवाडी या ठिकाणी पापड व्यवसाय करण्यासाठी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. Employment for women through Aarekar Foundation
यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री.साहिल आरेकर, स्वामिनी कौशल्य विकास संस्था अध्यक्ष सौ.स्वरा सावंत , नगरसेवक श्री.राजेंद्र भागडे, माजी नगराध्यक्ष सौ. स्नेहाताई भागडे, नगरसेवक श्री. सौरभ भागडे, श्री.गजानन जोशी, RDCC बॅंक व्यवस्थापक श्री.जनार्दन भागडे, श्री.मधुकर भागडे, श्री.किशोर भागडे, सौ. अंन्विता मांडवकर, सौ. पार्वती फटकरे, श्री. गजानन फटकरे, श्री. दत्ताराम भागडे, सुलोचना भागडे, सदानंद जोशी, संदेश भागडे, अरुण भागडे, महेंद्र जोशी आदी उपस्थित होते. Employment for women through Aarekar Foundation
