9 महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या उपकेंद्रात होतोय बिघाड
गुहागर, ता. 20 : मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर गुहागर शहर आणि परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेले चार दिवस सतत वीजेच्या लपंडाव सुरु आहे. यासाठी 9 महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेले महावितरणचे नवे उपकेंद्र कारणीभूत ठरत आहे. येथे नित्यनेमाने येणाऱ्या अडचणींमुळे जनतेबरोबरच महावितरणचे कर्मचारीही त्रासले आहेत.
After the onset of torrential rains, power play has started in Guhagar city and its environs. For the last four days, there has been continuous power outage. This is due to the new sub-center of MSEDCL which was started 9 months ago. Due to the regular problems that come here, not only the people but also the employees of MSEDCL are suffering.
गुहागर शहरासह असगोली आणि वरवेली परिसरासाठी स्वतंत्र उपकेंद्र बांधण्यात आले. या केंद्राचे काम 2018 च्या अखेरीस पूर्ण झाले होते. मात्र शृंगारतळी उपकेंद्रातून या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या 33 के. व्ही. दाबाच्या वीज वाहिनीच्या काम रखडले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर तब्बल वर्षभराने 3 ऑक्टोबर 2020 ला हे उपकेंद्र कार्यरत झाले. दरम्यानच्या काळात उपकेंद्र सुरु न झाल्याने येथील अनेक गोष्टी गंजू लागल्या. त्याचा फटका उपकेंद्र कार्यरत झाल्यानंतरच्या पहिल्या पावसाळ्यात बसत आहे. काहीवेळा वीज वाहिन्या जोडणारी गंजलेली ब्रॅकेट गरम होवून तुटतात, तर काही वेळा गंजलेले नट बोल्ट तुटतात. एखादी वीज वाहिनी स्पार्क होत रहाते. एखादी छोटीशी घटना देखील अत्याधुनिक नियंत्रण कक्षात नोंदवली गेली की संपूर्ण वीज व्यवस्था बंद पडते. मग बिघाड कोठे झाला आहे ते शोधुन दुरुस्त करेपर्यंत वेळ जातो. त्यामुळे वीज प्रवाह वारंवार खंडीत होतो. अशी माहिती गुहागर उपकेंद्राच्या उपअभियंता कु. प्रियांका वाठोरे यांनी दिली. दररोज वेगवेगळ्या अडचणींचा सामना उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचारी देखील त्रासलेले आहेत. तर निर्बंध शिथिल झाल्यावर हळुहळु उद्योग व्यवसाय रुळावर येत असताना महावितरणच्या या अघोषित डाऊनमुळे जनता हैराण झाली आहे. (Electricity Problem in Guhagar)