गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अडुर कोंडकरूळ, नागझरी, बुदल या पंचक्रोशीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजेचा पुरवठा सातत्याने खंडित होतं असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लाईट नसल्याने पिण्याच्या पाण्याचा डीपी जळला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐराणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी गुहागर तालुका बळीराज सेनेचे तालुका कार्यकारणी सदस्य दीप हळये यांनी केली आहे. Electricity outage in Adur Kondkarul village


अडुर येथे चार दिवस व नंतर पाच दिवस असे एकूण नऊ दिवस पिण्याचे पाणी न आल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल झाले आहेत. डीपी जळल्याने पाणी येत नाही असे सांगण्यात येते. विदयुत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने मोबाईल बंद आहेत. रेंज नाही, पंप बंद आहेत. अश्या अनेक समस्या आहेत. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. Electricity outage in Adur Kondkarul village