गुहागर नगरपंचायतीत 23 व 24 नोव्हेंबरला विशेष सभा
गुहागर, ता. 20 : येथील नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी करीता 23 नोव्हेंबरला विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या रिक्त सभापती पदासाठी 24 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष आणि शहर विकास आघाडी काय जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. A special meeting has been called on November 23 for the election of Deputy Mayor in Guhagar Nagar Panchayat. Election for the vacant post of Chairperson of Women and Child Welfare Committee will be held on 24th November. (Election for Deputy Mayor and Chairperson)
4 ऑक्टोबरला विषय समित्यांसाठी निवडणूक झाली. त्याचवेळी शहर विकास आघाडीने सभापती व उपनगराध्यक्ष पदाची नावे निश्चित केली होती. त्यामुळे 23 नोव्हेंबरला गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष (Deputy Mayor) पदी सौ. प्रणिता प्रविण साटले यांची निवड होणार हे जवळपास निश्चित आहे. सौ. प्रणिता साटले या शहर विकास आघाडी म्हणून निवडून आल्या असल्या तरी या भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यां आहेत. त्यामुळे प्रणिता साटलेंच्या रुपाने भाजपच्या एका कार्यकर्त्याला उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळणार आहे. निवडणूकीची औपचारिकता पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा, जल:निस्सारण नियोजन आणि विकास समितीचे सभापती पद स्वाभाविकपणे त्यांच्याकडे येईल.
4 ऑक्टोबरला झालेल्या विषय समित्यांच्या निवडणूकीचे वेळी भाजप सत्तेतून बाहेर पडल्याने महिला व बाल कल्याण समितीचे सभापती पद (Chairperson of Women and Child Welfare Committee) रिक्त ठेवण्याची वेळ शहर विकास आघाडीवर आली. त्यावेळी समिती सदस्य म्हणून सौ. मनाली महेश सांगळे, सौ. स्नेहल सुनिल रेवाळे, सौ. मृणाल राजेश गोयथळे आणि सौ. भाग्यलक्ष्मी महेश कानडे यांची निवड करण्यात आली.
या समितीचे सभापती पदासाठी सौ. मनाली महेश सांगळे यांचे नाव शहर विकास आघाडीने निश्चित केले होते. आता शहर विकास आघाडी सभापती पद रिक्त राहू नये म्हणून भाजपची कशी समजूत काढणार, भाजप शहर विकास आघाडीच्या विनंतीला मान देणार का, ही समिती सभापती विना कारभार करणार का. अशा वेळी सौ. मनाली सांगळे यांची समजूत कशी काढणार. हे सर्व प्रश्र्न उपस्थित होतात. या प्रश्र्नांची सोडवणूक शहर विकास आघाडी कशी करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष आहे.
३ व ४ ऑक्टोबरला गुहागर नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडीदरम्यान घडलेल्या घटना वाचण्यासाठी खालील बातम्यांवर क्लिक करा.
विषय समित्यांबाबत अजुनही अनिश्चितता
भाजप सत्तेतून बाहेर पडणार
नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापतीविना