• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 November 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यातील ११ शाळांना ई-लर्निंग साहित्य भेट

by Mayuresh Patnakar
November 28, 2026
in Guhagar
58 1
0
E-learning material for schools
114
SHARES
327
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट व चैतन्य सॉफ्टवेअरचा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मिळणार चालना

गुहागर, ता. 28 : प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे आणि चैतन्य सॉफ्टवेअर, पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ प्राथमिक शाळांना ई-लर्निंग साहित्याचे संच भेट देण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे आणि भाजपाचे तालुका सरचिटणीस सचिन ओक यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद आदर्श शाळा शीर नं. १ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. E-learning material for schools

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील समुद्रातील प्राचीन भिंतीचा शोध लावणारे ज्येष्ठ इतिहास व पुरातत्त्व संशोधक डॉ. अशोक मराठे यांनी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणकीय आणि आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. या उपक्रमाला चैतन्य सॉफ्टवेअर, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले. E-learning material for schools

उपसभापती निलेश सुर्वे, भाजपाचे तालुका सरचिटणीस सचिन ओक आणि नरवण येथील डॉ. कैलास वैद्य यांच्या माध्यमातून या दोन्ही संस्थांकडे ई-लर्निंग साहित्य मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोक मराठे, ट्रस्टी अश्विन महाजन, नीता गांधी, नरेंद्र नांदुरकर, अवधूत नांदुरकर, संजय देशपांडे आणि प्रज्ञा देशपांडे यांच्या सहकार्याने ११ शाळांना ई-लर्निंग साहित्याचे संच देण्यात आले. E-learning material for schools

यामध्ये कोतळूक शाळा नं. १, कर्दे शाळा नं. १, मासू शाळा नं. १, काताळे नवानगर उर्दू शाळा, शीर शाळा नं. १, पिंपर शाळा नं. १, पडवे उर्दू शाळा, तवसाळ बाबरवाडी, तवसाळ तांबडवाडी, काताळे शाळा नं. १ आणि तवसाळ शाळा नं. १ या शाळांचा समावेश आहे. E-learning material for schools

यावेळी शीर पंचायत समिती सदस्या स्नेहाताई शिगवण, शीर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्याधर गुरव, शीर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण शिर्के, नयन गुरव, पोलीस पाटील पूर्वा भाटकर, सागर काटदरे, विजय मसुरकर, जद भाटकर, नाईफ बावडे, प्रकाश मोरे, पांडुरंग नाचरे, चेतन गुरव, राजेश सुर्वे, मिलिंद टक्के, वेदिका शहाणे, शांताराम डावल, राहुल पवार, हेमंत गुरव, समीर मोरे आदी उपस्थित होते. तसेच सर्व लाभार्थी शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शीर शाळा नं. १ चे मुख्याध्यापक सुहास गायकवाड, केंद्रप्रमुख सुहासिनी गायकवाड, सहशिक्षक अजय खेराडे आणि रेडेकर मॅडम यांनी केले. E-learning material for schools

Tags: E-learning material for schoolsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.