गुहागर, ता. 13 : तालुक्यातील खोडदे सहाणवाडी येथील नवसाला पावणाऱ्या आई नवलाई देवीचा दसरा ( दसरा गवर)उत्सव रविवार दिनांक 11 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. खोडदे पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून आई नवलाई देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खोडदे सहाणवाडी येथील आई नवलाईदेवी देवस्थान मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी केले आहे. Dussehra festival of Navlai Devi at Khodde

मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या दिवशी रात्री 10:00 ते 11:00 यावेळेत स्थानिक मंडळांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री 11:00 ते 11:30 देवीची पहिली आरती त्यानंतर रात्री 11:30 ते 12:30 या वेळेत जाखडी नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर रात्री 12:30 वाजता देवीची दुसरी आरती होणार आहे. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:30 वाजता निमंत्रित जाखडी नृत्य सादर होणार असून शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:30 वाजता निमंत्रित जाखडी नृत्य सादर होणार आहे. Dussehra festival of Navlai Devi at Khodde
रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:30 वाजता निमंत्रित जाखडी नृत्य सादर होणार असून मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर (दसरा) 2026 रोजी दुपारी 03:30 वाजता नवलाई देवीच्या देवळात आणि अंगणात जाखडी नृत्य सादर होणार असून सायंकाळी 04:30 वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री 10:00 वाजता स्थानिक मंडळाचे भजन सादर होणार आहे. त्यानंतर रात्री 11:00 वाजता आईची आरती होणार असून रात्री 11:30 वाजता जाखडी नृत्य सादर होणार आहे. त्यानंतर रात्री 12:30 वाजता गौरीचे नवस फेडण्याचा कार्यक्रम संपन्न होणार असून रात्री 01:30 वाजता आईची दुसरी आरती होईल आणि गौरीचे विसर्जन होईल या संपूर्ण कार्यक्रमाला खोडदे पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन खोडदे सहाणवाडी नवलाईदेवी देवस्थानचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी केले आहे. Dussehra festival of Navlai Devi at Khodde
