• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उघडले श्री दुर्गादेवी दर्शनाचे द्वार

by Mayuresh Patnakar
October 5, 2021
in Old News
19 0
0
उघडले श्री दुर्गादेवी दर्शनाचे द्वार
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

घटस्थापनेपासून सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 दर्शन

गुहागर, ता. 5 : शहरातील वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर घटस्थापनेपासून (7 ऑक्टोबर) भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत भक्तांना कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. Shri Durgadevi Temple (Varchapat Guhagar) will be open for Darshan to devotees from Ghatsthapana (October 7). Devotees will be able to take darshan daily from 7 am to 12 noon and from 12.30 pm to 6.30 pm following all the rules of the corona.

महाराष्ट्र शासनाने 7 ऑक्टोंबर पासून सर्व प्रार्थना मंदिरे उघडण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे सर्व मंदिर व्यवस्थापन समित्यांना मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासही सांगितले आहे.  श्री दुर्गादेवी देवस्थानमध्ये 7 ऑक्टोबर 2021 पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु होत आहे. या उत्सवाचे नियोजन श्री दुर्गादेवी देवस्थान कमिटीने केले आहे. त्याप्रमाणे मंदिर प्रवेशावेळी मास्क घालणे बंधनकारक आहे. वय वर्ष 65 वरील नागरिकांना व वय वर्ष 10 खालील मुलांना मंदिरांत प्रवेश दिला जाणार नाही. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. श्री दुर्गादेवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर सकाळी 7 ते 12 व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत खुले रहाणार आहे. रांगेत राहूनच दर्शन घ्यायचे आहे. श्री दुर्गादेवीच्या पादुकांवर ओटी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभिषेक, पंचामृती पूजा, गोंधळ व इतर सर्व धार्मिक कृत्ये केली जातील. धार्मिक कृत्ये केवळ पुजारी करतील. प्रसाद व अंगारा पोस्टामार्फत पाठविण्यात येईल. वरील नियमांमध्ये बदल करण्याचा किंवा वाढविण्याचा अधिकार पंच मंडळींनी राखून ठेवला आहे.

Shree Durgadev Mandir
Tags: Breaking NewsDurgadevi TempleGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiगुहागरगुहागर न्यूजगुहागरमधील बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.