पंकज बीर्जे : आजपर्यंत कोणीही अपात्र ठरले नव्हते
गुहागर, ता. 18 : सहकारात राजकारण असु नये (No Politics in Co-operation Sector) असे म्हणणाऱ्या डॉ. चोरगेंनी केवळ राजकारण नाही तर कट कारस्थान (conspired) रचले. जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये (RDCC Bank Election) यापूर्वीच्या एकाही निवडणुकीत मतदारांना अपात्र (Voter Disqualified) ठरविले गेले नव्हते. ते कुशाग्र बुद्धीच्या चोरगेसरांनी यावेळी करुन दाखविले आहे. (Dr. Chorage conspired to disqualify Voter) असे परखड मत पालशेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक पंकज बीर्जे यांनी व्यक्त केले.
पंकज बीर्जे यांना 29 डिसेंबर 2019 ला मतदार प्रतिनिधी म्हणून पालशेत सोसायटीने नियुक्त केले. त्यावेळी पालशेत सोसायटी 4353 रुपये रत्नागिरी जिल्ह्या बँकेचे देणे होती. जिल्हा बँकेकडील पालशेत सोसायटीच्या खात्यात 3 लाख 77 हजार 18 रुपये जमा होते. पंकज बीर्जे यांची मतदार प्रतिनिधी म्हणून निवड केल्याचे पत्र जिल्हा बँकेकडे पोचल्यावर 30 डिसेंबर 2019 ला बँकेने पालशेत सोसायटीच्या बचत खात्यातून 4353 रुपयांचे देणे वसुल केले. 31 डिसेंबर 2019 ला पालशेत सोसायटीला थकबाकी नसल्याचे पत्रही दिले.
वास्तविक 4353 रुपये ही रक्कम कोणत्याही कर्जाची थकबाकी, व्याज नव्हते. तर एका शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे होते. सदर रक्कम शेतकऱ्यांकडून वसुल करावी अशी माहिती पालशेत सोसायटीला जिल्हा बँकेने दिलेली नव्हती. अपात्र ठरल्यानंतर पंकज बीर्जे यांनी चौकशी केली. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार समोर आला.
याबाबत पंकज बीर्जे म्हणाले की, जिल्हाबँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे, अन्य संचालक आणि बँकेचे व्यवस्थापन पहाणारे अधिकारी यांना पिकविम्याची रक्कम आणि थकबाकी यातील फरक समजत नाही. असे म्हणणे चुकीचे ठरेल. डॉ. चोरगेंनी आपल्या बुद्धीच्या बळावर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. विकास संस्थाचे मतदार प्रतिनिधी अपात्र ठरत असल्याचे लक्षात आल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना किंवा निबंधक खात्याच्या आयुक्तांकडे अपात्रता रद्द करण्याचे काम डॉ. चोरगे आणि मंडळी करु शकली असती. बँक आपल्या मतदारांच्या पाठीशी उभे राहु लागली असती. मात्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील त्रासदायक ठरतील अशा मतदार प्रतिनिधींना कायदेशीररित्या अपात्र बनविण्याचे कटकारस्थान डॉ. चोरगे यांनी काही संचालकांना सोबत घेवून रचले.