गुहागर, ता. 16 : गुहागर आगारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी श्री स्वप्निल शिंदे यांनी सांगितले की, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य जनतेला व देशाला प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचाराने प्रत्येकाने प्रगती करावी. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान खूप मोठे आहे ते समजून जाणून घेणे आवश्यक आहे. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Guhagar Depot
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून अप्रतिमान पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आगार प्रमुख स्वप्निल शिंदे, गुहागर तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पत्रकार पराग कांबळे, गुहागर तालुका पत्रकार मयुरेश पाटणकर, आगारातील अधिकारी सौ स्नेहा पालकर विचारे, मंदार कदम, गुहागर भाऊ डजन सहकारी संघाचे पदाधिकारी वैभव गमरे, भीमसेन सावंत महिला मंडळाच्या पदाधिकारी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम बौद्ध उपासक शशिकांत जाधव यांनी पूजा पाठ कार्यक्रम विधीपूर्वक पार पाडला. गुहागर आगाराच्या वतीने कामगार वर्ग यांच्यावतीने उपस्थित सर्व मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Guhagar Depot
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगारातील चालक व वाहक आर बी गायकवाड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली राजा गायकवाड, सूर्यकांत भोसले, वाय आर मोहिते, सी जी जोगदंड, आर एन ढाले, ए एम कांबळे, आर के सोन कांबळे, पी एम मोहिते, एन बी सावळे, एस एम आवळे, आर एस मोहिते, पी एम गायकवाड, ऐ बी कांबळे, जी एन रायवळे, एन एन वाघमारे, पी एम मोहिते, रामेश्वर गायकवाड, संदीप जाधव, डी वाय कदम, डी आर कदम, ए एस कदम, सचिन होळंबे, ऐ ए पाटील, चालक व वाहक याने प्रचंड मेहनत घेतली. जयंतीनिमित्त सर्व उपस्थित मान्यवरांना बुंदीचे लाडू फरसाण व सरबत वाटप करण्यात आले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Guhagar Depot
या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी, प्रवाशाने, अधिकारी वर्ग, गुहागर तालुका प्रवासी संघटना, गुहागर पोलीस ठाणे आदींनी अमूल्य सहकार्य केल्याबद्दल कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आर बी गायकवाड यांनी आभार मानले. गुहागर तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहाने 135 व्या जयंतीचा कार्यक्रम प्रचंड उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्याबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा आसूड व गुलामगिरी या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti at Guhagar Depot
