अफसाना मुल्ला; वेलदूर नवानगर शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
गुहागर, ता. 14 : विविध देशातील राज्यघटनांचा अभ्यास करून २ वर्षे ११ महिने १८ दिवस इतक्या कालावधीत भारताला संविधानाची निर्मिती करण्यात आली, स्वातंत्र्य, समता, बंधुता असे हक्क आपणाला मिळाले. देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांनी स्त्रिया व शोषित समाजासाठी कायदे केले, संविधानापेक्षा काहीच मोठे नाही, भारतातील राज्यघटना ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. असे प्रतिपादन अफसाना मुल्ला यांनी केले. जि. प. आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी बोलत होते. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निलेश पाटील यांनी केले. त्यांनी डॉ आंबेडकरांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील म्हणाले की , विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातून स्फूर्ती घ्यावी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले व संपूर्ण आयुष्य बांधवांसाठी व्यतीत केले, अत्यंत मेहनतीने व अभ्यासपूर्ण रीतीने राष्ट्राला संविधान अर्पण केले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड यांनी केले. यावेळी अनिश पालशेतकर, आरोही रोहीलकर ,अन्वी जांभारकर, सानवी रोहीलकर, साई नाईक, धन्वंतरी मोरे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळी डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांनी भाषणे केली. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
