परिवहन मंत्री अनिल परब, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
गुहागर, ता. 27 : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपण कायम चर्चा करत राहू. मात्र आता संप चालू ठेवून जनतेला वेठीस धरु नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कामगारांनी आता कामावर रुजू होण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. (We will always discuss the various demands of the ST employees. But now the people should not be held hostage by continuing the strike. Students are suffering academic losses. Workers now need to came back to work. This statement was made by Transport Minister Anil Parab.) (Don’t Hostage Public n Student)
वेतनवाढीच्या निर्णयानंतरही एसटी कामगारांनी संप सुरुच ठेवला आहे. हा संप मिटावा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी संयुक्त कृती समितीसोबत चर्चा सुरु केली आहे. एस.टी. कामगारांच्या इंटक, कामगार सेना, स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, आणि कास्ट ट्राईब संघटना अशा मुख्य संघटना आहेत. दिवाळीपूर्वी या कामगार संघटनांनी एकत्र येत एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीचे गठन केले आहे.
या समितीसोबत चर्चेत कृती समितीने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सातवा आयोग लागू केल्यानंतर संप मिटविण्यासाठी एस.टी. संघटना संपकऱ्यांचे मन वळवतील. अशी शक्यता वर्तविली जात आहे.
या चर्चेनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एस.टी.ला खाईत लोटू नका
कामगारांनी आता कामावर रुजू होण्याची आवश्यकता आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तिला आणखी खाईत लोटू नका. आम्ही आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते या सर्वांशी चर्चा केली आहे, अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या समितीसमोर मांडव्यात. आम्ही उच्च न्यायालय विलीनीकरणार जो निर्णय देईल, तो मान्य करणार आहोत. त्यामुळे यापुढे संप करून जनतेला वेठीला धरू नका.
कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
एसटी कर्मचाऱ्यांना मुळ वेतनात पगारवाढ दिलेली आहे. संयुक्त कृती समितीने काही अडचणी सांगितल्या आहेत. कोणताही कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगाराच्या वर जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. काही जाचक अटींवर चर्चा केली जाईल. कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदार घेऊ. पण कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. सर्वांनी पुन्हा कामावर हजर व्हावे.
संबंधित बातम्या
एस.टी. संपाबाबतची इत्यंभूत बातमी
एस.टी.ची वेतनवाढ
एस.टी.चे 11 हजार 549 कर्मचारी कामावर