• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिक्षणासाठी दानशूरांचे योगदान

by Mayuresh Patnakar
June 20, 2026
in Guhagar
16 0
0
Donors' contributions to education
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रोख पारितोषिके व पंख्यांची भेट

गुहागर, ता. 20 : शहरातील गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य, कै. विष्णुपंत पवार कला व कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर येथे पालक व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणारा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. Donors’ contributions to education

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील विविध घटकांकडून मिळणारे सहकार्य नेहमीच प्रेरणादायी ठरत असते. याच भावनेतून खातू मसाले उद्योगाच्या मालक उद्योजिका सौ. श्रुती शैलेंद्र खातू यांनी विद्यालयातील दोन होतकरू विद्यार्थीनी कुमारी सिमरन मालप व कु. निर्विघ्न वांगणकर यांना शालेय साहित्य तसेच रोख पारितोषिक देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन दिले. याशिवाय, कै. चारुदत्त काशिनाथ खातू यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू व विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. शैलेंद्र शाळीग्राम खातू यांनी विद्यालयाला दोन पंख्यांची भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोलाचे योगदान दिले. या योगदानामुळे विद्यालयाच्या सुविधांमध्ये भर पडली असून विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. Donors’ contributions to education

विद्यालय परिवाराने सौ. श्रुती खातू आणि श्री. शैलेंद्र शाळीग्राम खातू यांच्या सामाजिक बांधिलकीचे व शिक्षणाप्रती असलेल्या आस्थेचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या उत्साहाने शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. Donors’ contributions to education

या कार्यक्रमास गुहागर केंद्रप्रमुख श्री. मनोज पाटील, उद्योजिका सौ. श्रुती खातू, मुख्याध्यापिका सौ. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. सावंत, पर्यवेक्षिका सौ. कनगुटकर, सौ. शिंदे तसेच देवळेकर साहेब उपस्थित होते. Donors’ contributions to education

Tags: Donors' contributions to educationGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.