• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर

by Mayuresh Patnakar
October 23, 2026
in Guhagar
130 2
0
Diwali holiday schedule announced
256
SHARES
732
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत असणार सुट्टी

मुंबई, ता. 23 : राज्यातील सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले केले आहे. २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होणार आहे. या कालावधीत धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा, बालिप्रतिपदा, भाऊबीज या सार्वजनिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. Diwali holiday schedule announced

शाळांना उन्हाळी सुट्ट्या किती दिवस असणार ?

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सर्व शाळा १६ नोव्हेंबर २०२६ पासून पुन्हा सुरू होणार आहेत. शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ ते १ मे २०२७ पर्यंत असणार आहे. त्यानंतर ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी असणार आहे. माध्यमिक शाळा संहितेनुसार, संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. Diwali holiday schedule announced

Tags: Diwali holiday schedule announcedGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.