• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रामललांच्या मंत्राक्षता जिल्ह्यात येणार

by Mayuresh Patnakar
November 8, 2023
in Bharat
104 1
3
Distribution of Ramlal's chanted Akshats
204
SHARES
583
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अयोध्यत वितरणाचा कार्यक्रम संपन्न, जानेवारीतही दिवाळी

गुहागर, ता. 07 : 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान संपूर्ण देशातील जनतेला राममंदिर दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी रामललांसमोर मंत्रवलेल्या अक्षतांचे वितरण ५ नोव्हेंबरला करण्यात आले. यावेळी कोकण प्रांतात विरतण करण्याचा मंगल कलश  विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे व समरसता प्रमुख नरेश पाटील यांनी अयोध्येत स्विकारला. Distribution of Ramlal’s chanted Akshats

गेल्या 5 शतकांचे भारतीयांचे राममंदिराचे स्वप्न जानेवारी महिन्यात पूर्ण होणार आहे. 22 जानेवारीला  अयोध्येमध्ये माननीय पंतप्रधान व माननीय मोहनजी भागवत यांच्यासह हजारो संतांच्या उपस्थितीत रामललांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर 24 जानेवारीपासून रामललांचे दर्शन सर्वांसाठी खुले होणार आहे.  या निमित्ताने जगभरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याचे नियोजन  करण्यात आले आहे. 22 जानेवारी देशभरातील साडेपाच लाख मंदिरांमध्ये आणि जगभरातील रामभक्त परिवारांनी आपल्या घरात विद्युत रोषणाई करावी, दिवाळीप्रमाणे पणत्यांनी संपूर्ण परिसर सजवावा. मंदिरांमध्ये महाआरतीचे नियोजन करावे. घराघरात उत्सव साजरा करावा. असे विविध कार्यक्रम करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 जानेवारी ते 15 जानेवारी या काळात देशातील 10 कोटी परिवारांना मंत्राक्षता देवून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

या मंत्राक्षता थेट अयोध्येतून संपूर्ण देशात वितरीत करण्याचा कार्यक्रम 5 नोव्हेंबरला अयोध्येत झाला. यासाठी देशभरातून विश्र्व हिंदू परिषदेच्या विविध प्रांतांचे कार्यकर्ते अयोध्येत एकत्र झाले होते. त्यांच्या उपस्थितीत रामललांच्या समोर संताच्या मंत्रघोषात मंगलाक्षतांचे कलक्ष मंत्रांकित करण्यात आले. हे मंगल कलश विधीवत प्रांत प्रतिनिधींना सुर्पूत करण्यात आले. या कार्यक्रमाला कोकण प्रांताचे सहमंत्री अनिऋध्द भावे आणि समरसता प्रमुख नरेश पाटील अयोध्येत गेले होते. प्रांतासाठीचा कलश या दोघांनी स्विकारला. Distribution of Ramlal’s chanted Akshats

सध्या हा मंगल कलश सायन कोळीवाडा येथील अशोकजी सिंघल रुग्ण सहाय्यता प्रकल्प परिसराती हनुमान मंदिरात ठेवण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात कोकण प्रांतातील सर्व जिल्ह्यांच्या प्रतिनिधींकडे विशेष सोहळ्याद्वारे मंत्राक्षतांचा कलश सुपूर्त करण्यात येणार आहे. तेथून डिसेंबर अखेर प्रत्येक तालुक्यात या मंत्राक्षता पोचविल्या जातील. अशी माहिती अनिऋद्ध भावे यांनी दिली आहे.  Distribution of Ramlal’s chanted Akshats

Tags: Distribution of Ramlal's chanted AkshatsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet51
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.