माजी सभापती सुनील पवार यांचा पुढाकार
गुहागर, ता. 02 : गुहागर विधासभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, माजी कॅबिनेट मंत्री श्री. भास्करशेठ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. हे कार्यक्रम गुहागर पंचायत समितीचे माजी कार्यतत्पर सभापती सुनील पवार यांच्या पुढाकाराने मोठ्या दिमाखात साजरे करण्यात आले. Distribution of Educational Material
वडदमधील जिल्हा परिषद शाळा नं. १, २, ४ या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप करण्यात आले. सुनील पवार हे आमदार भास्करराव जाधव यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. दरवर्षी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. आ. जाधव यांनी त्यांना सर्वसामान्य कार्यकर्ता ते गुहागर पंचायत समितीच्या सभापती विराजमान केले आहे. Distribution of Educational Material
या कार्यक्रमात बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती सुनील पवार यांनी आ. भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून तालुक्यात होत असलेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली. तालुक्यातील शिवसेना संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यसम्राट भास्करराव जाधवांना उदंड दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करुन श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या. Distribution of Educational Material
यावेळी गुहागर शिवसेनेचे उप तालुका प्रमूख श्री. नारायण गुरव, उप विभाग प्रमुख श्री. पिंट्या संसारे, जेष्ठ शिवसैनिक प्रमोद (मामा) शिर्के, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सदस्य श्री. अमरनाथ मोहिते, श्री. वसंत आग्रे, श्री. विजय जानवळकर, श्री .शंकर आग्रे, वसंत गोरीवले, अरविंद रामाणे, अमित वने, प्रमोद भंडारी, वडद गावचे सरपंच श्री. संदीप धनावडे, उप सरपंच रामचंद्र मुरमुरे, शुभांगी भुवड, भारती शिगवण, श्री. वैभव पवार, सुवर्णा सावंत, अविनाश जोगळे, वडद शाळा नं. १ चे मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के, शिक्षक वैभवकुमार पवार, अमोल मोहिते, महेंद्र बागडे, वडद शाळा नं. २ चे मुख्याध्यापक गणेश रोडे, मधुरा पवार, वडद शाळा नं. ४ चे मुख्याध्यापक विजय काणसे, विठ्ठल डाकरे व शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Distribution of Educational Material