• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शहरातील समस्यांवर शिवसेनेने केली मुख्याधिकार्‍यांशी चर्चा

by Mayuresh Patnakar
June 13, 2026
in Guhagar
124 1
0
Discussion with the Chief Officer regarding city issues
244
SHARES
696
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गुहागर शहराच्यावतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच पावसात गुहागर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व्यापारी व नागरिकांची गैरसोय झाली आहे. तसेच वरचापाट दादरी वरील घरांमध्ये पावसाचे पाणी घराघरात शिरत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न देखील गंभीर बनला असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. Discussion with the Chief Officer regarding city issues.

याशिवाय, गुहागर शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी काढलेल्या पत्राला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शविला. शहराच्या सुनियोजित विकासासाठी अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मत यावेळी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. गुहागरकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि स्वच्छता यावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या चर्चासत्रावेळी गुहागर शहर शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Discussion with the Chief Officer regarding city issues.

Tags: Discussion with the Chief Officer regarding city issuesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet61
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.