• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 January 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

टीओडी मीटर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना सवलत

by Guhagar News
January 21, 2026
in Guhagar
112 2
0
Discount for electricity consumers using TOD meters
221
SHARES
631
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरीतील 1 लाख 5 हजार तर सिंधुदुर्गातील 39 हजार ग्राहकांना लाभ

रत्नागिरी, ता. 21 : महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षासाठी निश्चित केलेल्या वीजदरानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत दि. 1 जुलै 2025 पासून सुरु आहे. या अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील 1 लाख 45 हजार 404 वीज ग्राहकांना जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यात एकूण 91 लाख 48 हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. Discount for electricity consumers using TOD meters

स्मार्ट टीओडी मीटरमुळे रत्नागिरी जिल्ह्यात माहे जुलै महिन्यात 48 हजार 481 ग्राहकांना 3 लाख 20 हजारांची, ऑगस्ट महिन्यात 91 हजार 360 ग्राहकांना 11 लाख 81 हजारांची, सप्टेंबर महिन्यात 1 लाख 10 हजार 135 ग्राहकांना 15 लाख 46 हजारांची, ऑक्टोंबर महिन्यात 1 लाख 1 हजार 531 ग्राहकांना 12 लाख 29 हजारांची, नोव्हेंबर महिन्यात 1 लाख 4 हजार 122 ग्राहकांना 13 लाख 27 हजारांची तर डिसेंबर महिन्यात 1 लाख 5 हजार 775 ग्राहकांना 11 लाख 35 हजारांची वीजदर सवलत मिळाली आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सहा महिन्यात एकूण  67 लाख 41 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.  Discount for electricity consumers using TOD meters

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहे जुलै महिन्यात 12 हजार 125 ग्राहकांना 67 हजारांची, ऑगस्ट महिन्यात  31 हजार 772 ग्राहकांना 3 लाख 97 हजारांची, सप्टेंबर महिन्यात  36 हजार 938 ग्राहकांना 5 लाख 48 हजारांची, ऑक्टोंबर महिन्यात 36 हजार 7 ग्राहकांना 4 लाख 41 हजारांची, नोव्हेंबर महिन्यात 37 हजार 790 ग्राहकांना 4 लाख 91 हजारांची तर डिसेंबर महिन्यात 39 हजार 629 ग्राहकांना 4 लाख 60 हजारांची वीजदर सवलत मिळाली आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सहा महिन्यात एकूण 24 लाख 7 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. Discount for electricity consumers using TOD meters

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होत असल्याने अचूक बिले मिळतात. घरातील विजेचा वापर दर एक तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येते. त्यामुळे वीज वापरावर देखील ग्राहकांचे थेट नियंत्रण राहणार आहे. टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी प्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. Discount for electricity consumers using TOD meters

सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. यात दि. 1 जुलै 2025 ते मार्च 2026 मध्ये 80 पैसे, सन 2027 मध्ये 85, सन 2028 व 29 मध्ये 90 पैसे तसेच सन 2030 मध्ये 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर व जास्त वीज वापर असणाऱ्या इतर उपकरणांचा वापर करू शकतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आधिक फायदा होणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे. Discount for electricity consumers using TOD meters

स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहे. तसेच घरात किती वीज वापरली याची माहिती सर्व माहिती संबंधित ग्राहकाच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे योग्य वीज वापराचे नियोजन करता येईल. यासह ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोगा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहे. या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Discount for electricity consumers using TOD meters

Tags: Discount for electricity consumers using TOD metersGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.