• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामपंचायतींच्या विकासाला मिळणार गती

by Mayuresh Patnakar
August 12, 2026
in Maharashtra
31 0
0
Development of Gram Panchayats to gain momentum
61
SHARES
174
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शासनाकडून ५ नवीन योजनांना मंजुरी; विकासकामांसाठी ९० लाखांचा निधी

गुहागर, ता. 12 : गावांचा कायापालट करण्यासाठी आणि वाढत्या विकास गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच नवीन महत्वपूर्ण योजनांना मंजूरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे आता ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी एकूण ९० लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Development of Gram Panchayats to gain momentum

सध्या ग्रामपंचायतींना ‘जनसुविधांसाठी विशेष अनुदान या घटकातून निधी पुरवला जात होता. मात्र, यासाठीचे निकष तब्बल १५ वर्षांपूर्वी (२०१० मध्ये) ठरवण्यात आले होते. बदलत्या काळात गावांच्या विकासाची व्याप्ती आणि गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्वतंत्र व नावीन्यपूर्ण योजनांसाठी निधीची मागणी सातत्याने होत होती. ग्रामपंचायतींची ही गरज ओळखून शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. Development of Gram Panchayats to gain momentum

ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार, या पाच योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या कामांसाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून पुन्हा निधी घेता येणार नाही. एकाच कामासाठी दोन वेळा निधी वापरला जाऊ नये आणि पारदर्शकता राहावी, यासाठी ही कडक अट घालण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील क्रीडा, ऊर्जा, शिक्षण आणि सुशोभीकरणाच्या प्रश्नांना मोठी चालना मिळणार असून ग्रामीण जनतेतून या निर्णयाचे स्वागत होत आहे. Development of Gram Panchayats to gain momentum

कोणत्या ५ योजनांसाठी मिळणार निधी?

शासकीय पडीक जागांचे सुशोभीकरण: रु. १५ लाख, शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली: रु. २० लाख, अद्ययावत वाचनालय इमारत बांधकाम रु. २० लाख, क्रीडांगण विकास व सुविधा: रु. २० लाख, सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था: रु. १५ लाख. Development of Gram Panchayats to gain momentum

Tags: Development of Gram Panchayats to gain momentumGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.