• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आचारसंहितेमुळे जून महिन्याचा लोकशाही दिन रद्द

by Mayuresh Patnakar
May 28, 2026
in Maharashtra
125 1
0
245
SHARES
699
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 28 : जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे जून २०२६ मधील दिनांक १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे. Democracy Day Cancelled Due to Code of Conduct

जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे जून २०२६ चा लोकशाही दिन सोमवार दि.१ जून रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात होणार होता. तथापि, महाराष्ट्र विधान परिषद रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदुर्ग स्थानिक मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम दिनांक १८ मे पासून घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक १८ मे पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच दिनांक २५ जून पर्यंत जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे जून २०२६ मधील दिनांक १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. Democracy Day Cancelled Due to Code of Conduct

Tags: Democracy Day Cancelled Due to Code of ConductGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet61
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.