• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 June 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोडकाआगर धरणाच्या पाणी पातळीत घट

by Mayuresh Patnakar
June 4, 2026
in Old News
57 0
0
111
SHARES
318
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : गुहागर परिसराला पाणीपुरवठा करणारे मोडकाआगर धरण आटले असून त्याची पाणीपातळी कमालीची घटली आहे. पावसाळा सुरू होण्याआधीच्या या दिवसांत वाढत्या उन्हामुळे आणि बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या मध्यावर पावसाने सुरुवात केली होती, में महिन्याच्या अखेरीस सदरचे धरण पूर्ण भरले होते. परंतु यावर्षी जून महिन्याचा पहिला आठवडा होत आला तरी अजूनही पावसाने दमदार सुरुवात न केल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी घटत चालली आहे. गेल्या वर्षी सदरचे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, सद्यस्थितीत तीव्र उन्हाळ्यामुळे हा साठा अत्यंत कमी झालेल्या दिसून येत आहे. Decline in water level at Modkaaagar Dam

Decline in water level at Modkaaagar Dam

या धरणावर गुहागर नगरपंचायतीसह असगोली, पाटपन्हाळे, पालशेत, वरवेली, धोपावे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजना अवलंबून आहेत. तसेच या परिसरामध्ये या धरणाच्या पाण्यावर उन्हाळी शेती सुद्धा करण्याचे प्रमाण वाढत आहे. या धरणामुळे परिसरातील असंख्य शेतकरी व बागायतदार यांच्या विहिरींना पाण्याचा मुबलक साठा होत असतो. परंतु धरण आटल्यामुळे या परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई होण्याची भीती निर्माण झाली आहे. धरणातील गाळ काढणे आणि पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून जोर धरत आहे. Decline in water level at Modkaaagar Dam

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarअसगोलीउन्हाळी शेतीटॉप न्युजताज्या बातम्याधोपावेपाटपन्हाळेपालशेतबागायतदारमराठी बातम्यामोडकाआगर धरणलोकल न्युजवरवेलीशेतकरी
Share44SendTweet28
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.