बदलत्या हवामानाने उत्पादनात घट; दिवसाला २५ हजारांची कमाई
गुहागर, ता. 02 : यंदाच्या हंगामात बदलत्या हवामानाचा मोठा फटका फळपिकांना बसला असून, उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ असलेल्या जांभळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे; मात्र, दुसरीकडे बाजारात जांभळाची मागणी प्रचंड असल्याने सध्या जांभळाला प्रतिकिलो १ हजार रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळत आहे. आवक कमी असल्याने वाढलेल्या या दरामुळे बाजारपेठेत जांभूळ विक्री करणार्या महिलांना चांगला आर्थिक दिलासा मिळत असून, त्या दिवसाला ५ ते २५ हजार रुपयांपर्यंतची कमाई करत आहेत. Decline in Jamun production

बाजारात फळांची आवक अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने दर गगनाला भिडले आहेत; मात्र, उत्पादन निम्म्याहून अधिक घटल्यामुळे मूळ उत्पादक शेतकर्यांना या वाढत्या दराचा फारसा फायदा झालेला नाही. यंदाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेले उत्पन्न पाहता नफा मिळणे कठीण झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. Decline in Jamun production
