• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यातील भूजल पातळीतील घसरण चिंताजनक

by Mayuresh Patnakar
October 17, 2026
in Guhagar
27 0
0
Decline in groundwater levels
53
SHARES
151
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सरासरी १.२३ मीटरने घट, १८३ गावांमध्ये टंचाईचा धोका

भूजल सर्वेक्षण अन् विकास यंत्रणेचा अंदाज; उपशावर निर्बंध

रत्नागिरी, ता. 17 : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पडलेल्या पावसात जवळपास २० टक्के घट झाली आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील भूजल पातळीवर झाला आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत चालू वर्षी भूजल पातळीत सरासरी १.२३ मीटरने घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे आगामी ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १८३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने व्यक्त केला आहे.  Decline in groundwater levels

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रत्नागिरीच्या अहवालानुसार, जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ३३९५.०९ मिमी पाऊस पडतो; मात्र यावर्षी केवळ २६९९.५३ मिमी. (१९.८१ टक्के घट) पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी आणि दापोली या तालुक्यांमध्ये पावसाची घट सर्वाधिक आहे. पावसाच्या या तुटीमुळे जिल्ह्यातील ६३ निरीक्षण विहिरींच्या नोंदीनुसार भूजल पातळीत सरासरी १.२३ मीटरने घट झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २.९६ मीटरने भूजल पातळी खाली गेली असून, राजापूर (१.४७ मी.), गुहागर (१.४१ मी.), लांजा (१.१७ मी.) आणि चिपळूण (१.०१ मी.) या तालुक्यांतही परिस्थिती गंभीर आहे.  Decline in groundwater levels

व्यावसायिक व अतिउपशावर प्रशासकीय देखरेख ठेवण्यात येईल. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी शोषखड्डे, शेततळी, वनराई बंधारे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मोहीम राबवण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाची घट आणि भूजल पातळीतील घसरण चिंताजनक आहे. टंचाईकाळात ग्रामस्थांना भीषण समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी आतापासूनच पाण्याचा संयमित वापर आणि पुनर्भरणाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. – एस. एस. गोंधळी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रत्नागिरी Decline in groundwater levels

Tags: Decline in groundwater levelsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share21SendTweet13
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.